Nandurbar News : देसाईपुऱ्यातील पुरातन संतांचे श्रीराम मंदिर अनेक वर्षांनंतर खुले

शहरातील देसाईपुरा भागात सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले.
Tribal Development Minister present at the ancient Shri Ram temple in Desaipura area. Vijayakumar Village.
Tribal Development Minister present at the ancient Shri Ram temple in Desaipura area. Vijayakumar Village.esakal

Nandurbar News : शहरातील देसाईपुरा भागात सुमारे सव्वाचारशे वर्षांपूर्वीचे संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले. त्यांनी तेथे स्वच्छता सेवा करून पंतप्रधान मोदी यांची संकल्पना राबविली.

सोमवारी अयोध्या येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरातील सर्व मंदिरांमध्ये शनिवारपासून स्वच्छता अभियान सुरू आहे. (Shri Ram temple of ancient saints in Desaipura opened after many years nandurbar news)

त्यानुसार नंदुरबार शहरातील विविध मंदिरांमध्येदेखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. देसाईपुरा भागात सुमारे सव्वाचारशे वर्षांपासून उभारण्यात आलेले पुरातन संतांचे श्रीराम मंदिर शनिवारी डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते उघडण्यात आले.

दोन गटांतील वादामुळे ते बंद होते. मंदिरांना विद्युत दिव्यांच्या माळा आणि महाप्रसाद मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.

Tribal Development Minister present at the ancient Shri Ram temple in Desaipura area. Vijayakumar Village.
Nandurbar News : ‘जयश्रीरामा’च्या घोषाने तळोद्यात भक्तिरस

दरम्यान, मंत्री डॉ. गावित यांनी सर्वांत जुन्या श्री संतांच्या राममंदिराची माहिती जाणून घेतली. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर पुरातन श्रीराम मंदिराच्या वास्तूची पाहणी केली.

त्यानंतर मंदिराचे ट्रस्टी मुकेश टिल्लू यांना डॉ. गावित यांच्या हस्ते मंदिरावर करण्यात येणाऱ्या रोषणाईचा संच सुपूर्द करण्यात आला. या वेळी मंदिराचे प्रमुख ट्रस्टी मुंबई येथील मुकेश टिल्लू, हेमलता टिल्लू, शलाखा फडके.

तसेच नंदुरबार येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष नीलेश देसाई, महादू हिरणवाळे, सविता जयस्वाल, भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन मराठे, आनंद माळी, लक्ष्मण माळी, रमेश चौधरी, नीलेश चौधरी, प्रशांत चौधरी आदींसह देसाईपुरा भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tribal Development Minister present at the ancient Shri Ram temple in Desaipura area. Vijayakumar Village.
Nandurbar News : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रकाशात मोटारसायकल रॅली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com