Video : एकाला वाचायला गेले आणि दुदैवाने सहाजण बुडाले (व्हिडिओ)

Video : एकाला वाचायला गेले आणि दुदैवाने सहाजण बुडाले (व्हिडिओ)

शहादा (जि नंदुरबार) : वडछिल (ता. शहादा) येथे गणपती विसर्जनाच्या वेळी सहा मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना येथे घडली आहे. जलसंधारणाच्या कामातून तयार केलेल्या तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू होते. त्यावेळी हा प्रकार घडला आहे. सहा मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत. या चित्रकथे कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कैलास संजय चित्रकथे (वय १७), सचिन सुरेश चित्रकथे(१९), विशाल मंगल चित्रकथे (१७), दीपक सुरेश चित्रकथे (२१), रविंद्र शंकर चित्रकथे (२९) सागर आप्पा चित्रकथे (२०) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गणपती विसर्जनाच्या वेळी कोणत्याही प्रकारची वाद्ये न वाजवण्याचा निर्णय या मुलांनी घेतला होता.



विसर्जनानंतर आंघोळ करण्यासाठी गावालगत उत्तरेला गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या छोट्याशा तलावात अंघोळीला गेले होते. त्यावेळी एक मुलगा बुडायला लागला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी इतर पाचजण पाण्यात उतरले होते. परंतु, त्यांचा दुदैवी अंत झाला. घटनेमुळे वडछिल गावावर शोककळा पसरली आहे. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मनोज कुमार खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com