
नाशिक : प्रत्येक ठिकाणी तारीख लिहून दस्तावेज तयार केले जातात. शासकीय असो की खासगी, सार्वजनिक असो की व्यक्तिगत, कोणतेही निवेदन किंवा पत्र तारीख लिहिल्याशिवाय पूर्ण व अधिकृत होत नाही. त्यामुळे व्यवहारात व प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजात दिवसभरात अनेकदा तारीख लिहिण्याचा प्रसंग येतो. तारीख लिहिताना लघुरूपातील (शॉर्टकट) तारीख लिहिणे प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेले आहे. मात्र बुधवार (ता. 31)पासून सुरू होणाऱ्या नवीन 2020 या वर्षात तारीख लिहिताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा "तारीख पे तारीख' होण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षात व्यवहार करताना घ्यावी लागणार विशेष काळजी
वर्ष 2020 मध्ये तारीख लिहीत असताना विशेष काळजी घ्यावी लागणर आहे. तारीख लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहावी लागेल. तारीख लिहिताना आपल्याला सवय झालेल्या 01-01-20 अशी लघुरूपात लिहून चालणार नाही, तर 01-01-2020 अशा पूर्ण स्वरूपात लिहावे लागणार आहे. कारण जर तारीख लघुरूपातील लिहीत असाल तर इसवीसनाच्या आकड्यात फेरबदल, आकड्यांचा विस्तार करणे सोपे होऊन हेराफेरी व फसवणूक होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सवयीच्या झालेल्या 01-01-20 अशा लघुरूपातील तारीख लिहिली तर यामध्ये कोणीही 01-01-2000 किंवा 01-01-2019 मध्ये किंवा त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वर्षाच्या दरम्यान बदलू शकतात. त्यामुळे 2020 वर्षात कोणतीही कागदपत्रे प्राप्त करताना किंवा स्वत: लिहिताना पूर्ण स्वरूपात लिहिलेली तारीख यांची काळजी घ्यावी लागणार आहे. ही समस्या यंदा कायम राहील.
हेही वाचा > आयुष्यातील आव्हाने..आईचे काबाडकष्ट...अन् मुलांचा उध्दार!
सावधानतेचा संदेश व्हायरल
सध्या सोशल मीडियातून याबाबतचे अनेक अफलातून संदेश फिरताना दिसत आहेत. सरत्या 2019 वर्षाला निरोप व येणाऱ्या नवीन 2020 वर्षाच्या स्वागताच्या संदेशांबरोबर तारीख लिहिण्याबद्दलच्या सावधानतेचे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.