Nandurbar crime : खापरला शोर्य जागरण मिरवणुक यात्रेत दगडफेक; दुकानांची तोडफोड

burned shop in riot at Selamba.
burned shop in riot at Selamba.esakal

खापर : महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा वरती भागात असलेल्या सागबारा तालुक्यातील सेलंबा या गावात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शौर्य जागरण मिरवणुक यात्रेवर दगडफेक करण्यात आली. (Stone pelting during Shorya Jagran procession at Khapar Vandalism of shops )

शुक्रवारी (ता. २९) सकाळी दहाला हा सर्व प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परंतु या दगडफेकीत अनेक दुकानांचे नुकसान झाले तर दहा ते अकरा जणांना दुखापत झाली

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने दक्षिण गुजरात शौर्य जागरण यात्रा निमित्त कुयदा या परिसरातून सेलंबा या गावात सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक दाखल होत असताना येथील अल्पसंख्याक प्रार्थना स्थळाजवळ मिरवणूक रथावर काही समाज कंटकाकडून दगडफेक झाली.

यानंतर दोन समुदायात हाणामारी झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून परंतु दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

burned shop in riot at Selamba.
Nashik Crime: शहरात किरकोळ कारणातून मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ! 5 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

तसेच एका कटलरी व स्टेशनरी दुकानाची जाळपोळ झाल्याने दुकानातील माल जळून खाक झाले तर टेलरिंग, मोबाईल, फळे आदी दुकानांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला व तणावपूर्ण शांतता आहे.

घटने मागील दोषींचा तपास सुरू आहे.व अफवांवर विश्वास न ठेवण्याचा नर्मदा पोलिस अधीक्षक प्रशांत सुंबे व सागबारा पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही.पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

''गुजरात राज्यातील सेलंबा हे गाव महाराष्ट्र सीमेलगत असल्याने अफवांना बळी पडून त्यांचे पडसाद अक्कलकुवा तालुक्यात उमटू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला आहे ''

- सदाशिव वाघमारे,उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकुवा

burned shop in riot at Selamba.
Nashik Crime: म्हसरूळ येथील महिलेच्या खुनाची होईना उकल; गुढ अद्यापही कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com