
Nandurbar News : रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धडगाव येथे कामबंद आंदोलन
धडगाव : तालुक्यातील धडगाव येथे तहसील कार्यालय व पंचायत समितीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात आले. या वेळी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार अक्राणी व गटविकास अधिकारी अक्राणी यांना निवेदन देण्यात आले.
मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधामध्ये समायोजन करण्यात यावे. (Strike by Rohyo contract employees at Dhadgaon Nandurbar News)
मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
हेही वाचा: Pune Crime News : पुण्यात तरुणांचा कोयते फिरवत हैदोस सुरूच; मार्केट यार्ड परिसरात अल्पवयीन...
पश्चिम बंगालच्या धरतीवर मानधन देण्यात यावे. योजनेतील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती करण्यात यावी. ग्रामरोजगर सेवक यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात.
मध्य प्रदेश शासनाप्रमाणे वयाच्या ६९ व्या वर्षापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी, अशा मागण्या केलेल्या आहेत. निवेदनावर दारासिंग पावरा, गजानन मराठे, सुधीर पवार, जेलसिंग पावरा, सुनील पावरा, हुमा पावरा आदींच्या सह्या आहेत.
हेही वाचा: Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी