सातपुड्याचा साखरेची केनियात निर्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

शहादा: भारताने साखर निर्यात करण्यासाठी धोरण स्वीकारले असून त्या अनुषंगाने सातपुडा कारखान्यात तयार झालेली सल्फर विरहित साखर युरोपात (केनिया) निर्यात करण्याचा दृष्टीने पहिला ट्रक विधिवत पूजन करून नुकताच रवाना करण्यात आला.

मागील वर्षीदेखील कारखान्याकडून ४० हजार क्विंटल सल्फर विरहित साखरेची निर्यात केली गेली होती. ही साखर उत्तम प्रतीची असल्यामुळे परदेशात खूप मागणी वाढत असून, यावर्षी ८० हजार क्विंटल निर्यात करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. कारखान्यास परवाना प्राप्त झालेला असून, फक्त या परवानानुसार गुणवत्तायुक्त साखर तयार होत आहे.

पालिका विषय समिती सभापती निवड बिनविरोध

मात्र मुस्लीम देशात साखर पाठवायची असल्यास परवाना घेणे बंधनकारक असते. त्याशिवाय मुस्लीम देशात कोणताही माल विक्री करता येत नाही. त्यामुळे सातपुडा कारखान्याने तोही परवाना मिळविला असून, त्यांना अभिप्रेत असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता कारखान्याने केलेली असल्यामुळे सदरचा परवाना प्राप्त झाला आहे.

त्यामुळे आता सातपुड्याची साखर मुस्लीम राष्ट्रात व परदेशात या हंगामापासून कुठेही विक्री करता येणार आहे. वेळोवेळी सातपुडा कारखान्याने अत्याधुनिक पद्धतीने बदल केले आहे. त्या संस्थांनी परीक्षण करून पात्र ठरविल्यामुळे परवाने प्राप्त झाले आहेत.

सल्फरमुक्त साखर युरोपियन व मुस्लीम राष्ट्रात पाठविण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती चेअरमन दीपक पाटील यांनी दिली.स्थानिक शेतकऱ्यांना सल्फर विरहीत साखर घ्यावयाची असल्यास सातपुडा कामगार सहकारी भांडारातून उपलब्ध करून देण्यात येईल. असे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी सांगितले.

जागा विकत घेऊ, मात्र गरिबांना घरकुल देऊ

सातपुडा कारखान्याची सल्फर विरहित साखरेचा पहिला ट्रक २३ जानेवारीस केनिया येथे पाठविण्यासाठी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग अहेर यांच्या हस्ते पूजन करून ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी संचालक पंडीतराव पाटील, शशिकांत पाटील, संदीप पाटील, महेंद्रसिंग गिरासे, डॉ.संजय पाटील, रतिलाल पाटील, प्रकाश पाटील, ज्ञानदेव पाटील, भटू चौधरी, ओंकार चौधरी, लक्ष्मण चौधरी, शशिकांत पाटील,कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, सेक्रेटरी सी.जी. पाटील, जनरल मॅनेजर अशोक पाटील, चीफ इंजिनिअर संजय चौधरी, सिव्हिल इंजिनिअर शरद पाटील, चीफ केमिस्ट विजय पाटील, संपर्क अधिकारी प्रवीण पाटील, गोडावून किपर बोरसे, कॉन्ट्रॅक्टर अंकुश डोके आदी उपस्थितीत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar manufactured at Satpuda exports to Kenya