Farmers Protest
sakal
प्रकाशा: केंद्र सरकारने उसाचा एफआरपीनुसार दर जाहीर केला आहे. मात्र, साखर कारखानदारांनी अत्यल्प दरात मनमानी करीत गाळप सुरू केले आहे. किमान तीन हजार रुपये दर जाहीर करावा. अन्यथा, टप्प्याटप्प्याने भीक मांगो, धरणे, साखळी उपोषण करण्यात येईल. उपयोग न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. २१) दिलेल्या निवेदनात दिला आहे.