Dhule News : मुंबई पोलिस दलातील पोलिसाची आत्महत्या

Kaluram Ahire
Kaluram Ahireesakal

पिंपळनेर (जि. धुळे) : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या व सध्या मंत्रालयाच्या सुरक्षा विभागात कार्यरत पोलिसाने त्याच्या मूळ गावी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Suicide of cop in Mumbai Police Force Latest Dhule News)

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

पहुबारे (ता.साक्री) मूळगाव असलेले काळुराम चैत्राम अहिरे (वय ५७) हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. हल्ली त्यांचे वास्तव्य विशानगरी अपार्टमेंट कल्याण (जि. ठाणे) येथे आहे. ते ७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आपल्या मूळ गावी बंधू छोटीराम अहिरे यांच्याकडे पहुबारेला येथे आले होते. दुसऱ्या दिवशी मी मुंबईला परत जाणार असल्याचे त्यांनी छोटीराम यांना सांगितले. त्यामुळे ते शेतकामासाठी बाहेर पडले. सायंकाळी गोठ्यात बैलांना पाणी देण्यासाठी ते गेला असता त्यांना तेथे बंधू काळूराम अहिरे हे लाकडी दांड्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना खाली उतरविले असता तोवर त्यांचा जीव गेलेला होता. आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नसून हवालदार पी. यु. सोनवणे हे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com