Dhule News : बँकांनी ATM स्थळी प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी : पोलिस अधीक्षक धिवरे

बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे. एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे.
ATM Security Guard
ATM Security Guardesakal

Dhule News : बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले पाहिजे. एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी अत्यंत आवश्यक आहे. बँकांनी एटीएमस्थळी प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशी सूचना पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केली.

शहरातील सर्व बँकांच्या प्रमुख प्रतिनिधींची पोलिस अधीक्षक दालनामध्ये बैठक घेण्यात आली. शहरातील ३४ एमटीएमच्या सुरक्षेचा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी आढावा घेतला. (Superintendent of Police Dhiware statement Banks should appoint trained security guards at ATM dhule news)

एटीएम, बँकेतील चोरी व एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक आदी गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विविध ३० बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत बँकेकडून शहरातील विविध परिसरात लावण्यात आलेल्या ३४ एटीएमची माहिती घेऊन सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला.

तसेच एमटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तींची पोलिस तपासणी झाली आहे का, कॅश व्हॅनसमवेत शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्यात येतात किंवा कसे, त्यांच्याकडील शस्त्र परवाना वैध आहे का, एटीएममधील सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत का ?

ATM Security Guard
Dhule News : प्रकाशा-बुराई योजनेला मिळणार सुधारित प्रशासकीय मान्यता : आमदार जयकुमार रावल

तेथील इमर्जन्सी अलार्म सिस्टिम सुरू आहे का, एटीएमचे केबिन व शटर सुरक्षेच्या दृष्टीने सुस्थितीत असते का, प्रत्येक एटीएमच्या ठिकाणी प्रशिक्षित सुरक्षारक्षक तैनात आहे का, एटीएम असलेल्या ठिकाणच्या जवळील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, एटीएम व बँकांचे सिक्युरिटी ऑडिट झाले आहे का आदींबाबात बैठकीत चर्चा झाली.

सर्व बँक प्रतिनिधींकडून माहिती घेण्यात आली. ज्या बँकेकडून सूचनांमध्ये त्रुटी असतील त्यांना त्यासंबंधी त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सूचना दिल्या.

ATM Security Guard
Dhule News : आता रोज 400 ठिकाणी ‘क्यूआर कोड’चे पेट्रोलिंग : पोलिस अधीक्षक धिवरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com