पावसाळ्यात ११५ पावसाची टक्केवारी असूनही 3 गावांना टँकरने पाणी

water tank
water tankesakal

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. धरणे ओव्हरफ्लो वाहिली. नद्या, नाले ओसंडून वाहिली. काही गावात अद्यापही नद्यांना पाणी आहे. पावसाळ्यात ११५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. असे असताना जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दोन टँकर तर कंडारी (ता. भुसावळ) येथे एक असे तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे पाणीटंचाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (water scarcity started Due to the rising heat)

water tank
नाशिक : माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही पाण्यासाठी वणवण

जिल्हा प्रशासनानेही यंदा पाणीटंचाई (water scarcity) जाणवणार नसल्याचे गृहित धरले होते. असे असले तरी एनवेळी टंचाई जाणवलीच तर पंचायत नको म्हणून २०२१-२२ या टंचाई कालावधीत ५०५ गावांकरिता ३ कोटी ११ लाख रुपयांचा संभाव्य कृती पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. एकूण १६ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेरला सहा, एरंडोलला दोन, भुसावळला दोन, मुक्ताईनगर एक, चाळीसगाव दोन, भडगाव दोन, पारोळा एक या गावांचा सामावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव या २ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कंडारी (ता. भुसावळ) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

water tank
मेळघाटात जलस्रोत आटले; शेतमजूर, गुराखी भागवतात डबक्यातील पाण्याने तहान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com