Dhule Accident News : आग्रा महामार्गावर मृत्यूचे तांडव! 5 दुचाकींचा चक्काचूर; कार चेंडूसारखी उडत ठिकऱ्या

JCB separated the accident vehicles from each other
JCB separated the accident vehicles from each other esakal

Dhule Accident News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक हॉटेलमध्ये शिरल्याने भीषण अपघात घडला.

हॉटेलमध्ये शिरण्यापूर्वी ट्रकने पाच दुचाकींचा चक्काचूर तर केलाच, शिवाय एक कंटेनर, एक पिक-अप, एक स्कूल बसलाही धडक देत होंडा अमेझ कार धडकेने चेंडूसारखी उडवत तिच्या अक्षरक्षः ठिकऱ्या उडविल्या. महामार्गावरील मृत्यूचा हा थरार पाहून बघ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. (Terrible accident due to driver lost control and truck into hotel dhule accident news)

सांगवीजवळील चारणपाडा गावासमोर चौपदरी महामार्ग ओलांडताच सदगुरू हॉटेल आहे. प्रतापसिंह गिरासे यांच्या मालकीचे हे हॉटेल म्हणजे परिसरातील मजूर आणि प्रवाशांसाठी हक्काचे ठिकाण होते. मंगळवारी (ता. ४) सकाळीही तेथे प्रवाशांसह जवळच असलेल्या कोळसापाणी पाडा येथील आदिवासीबांधव जमले होते.

चहा-नाश्ता सुरू होता. सकाळी साडेदहाला काही कळण्याच्या आतच मध्य प्रदेशकडून शिरपूरकडे जाणारा ट्रक (आरजे ०९, जीबी ९००१) थेट हॉटेलमध्ये घुसला. या अचानक झालेल्या आघाताने कुणालाच काही न सुचल्याने अनेक जण त्याखाली दबले गेले. ट्रकच्या धडकेने व टायरखाली चिरडून नऊ जणांच्या अक्षरक्षः चिंधड्या उडाल्या. या घटनेत दहा जणांचा बळी गेला, तर २८ जण जखमी झाले.

किंकाळ्यांनी वातावरण सुन्न

मृत आणि जखमींच्या किंकाळ्यांनी वातावरण सुन्न होऊन गेले. परिसरातील वाहनचालक, चारणपाडा व पळासनेर येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. हायवे सर्व्हिस, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णवाहिका आणि मदतीसाठी आलेल्या वाहनांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

JCB separated the accident vehicles from each other
Praveen Kumar Accident : दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! कंटेनरने मारली जोरदार धडक अन्...

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल जैन व सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले. शिरपूर पालिकेच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील डॉक्टर्सही उपचारासाठी धावले. गंभीर जखमींवर प्रथमोपचार करून तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयासह धुळे शहरातील खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. सध्या शिरपूरमध्ये चार जणांवर उपचार सुरू असून, उर्वरित २४ जणांवर धुळे येथे उपचार सुरू आहेत.

अपघातातील जखमी

अजय पावरा (वय १० वर्ष, रा. कोळसापाणी पाडा), नीलेश पावरा (वय २३, रा. बडवानी), अस्लम खान (वय ५०, रा. छोटा नांदगाव), सुमित्रा खंडू पावरा (वय ३५, रा. कोळसापाणी पाडा), अमरसिंह पावरा (वय २२, रा. आंबापाणी), अर्जुन पावरा (वय १३, रा. पाडशापाणी) धुळे रवाना, हसम खान (वय ४०, रा. मेवात, हरियाना), हेमराज जाधव (वय ४२, रा. अशोकनगर, नाशिक), शुभम खंडेलवाल (वय २६, रा. धुळे),

संजय राजपूत (वय ३०, रा. खुलताबाद) धुळे रवाना, मुलगी (वय १० वर्ष, रा. खुलताबाद) धुळे रवाना, पुरुष (वय ४०, रा. खुलताबाद) धुळे रवाना, रजत राजेश खंडेलवाल (वय ३०, रा. धुळे) धुळे रवाना, राजेश खंडेलवाल (५५, रा. धुळे) धुळे रवाना, दिनेश जारशा पावरा, गीता पावरा (वय १५ वर्ष), ललिता रमेश पावरा, अनिता पावरा, दीपक जगन पावरा, नंदिनी पावरा (वय १५), अजू पावरा, ब्रिजलाल दारासिंह पावरा (वय ३७), लाली छगल तरवले (वय १६, रा. पोलकी), किस्मा डेब्या पावरा (वय १५ रा. आंबापाणी).

JCB separated the accident vehicles from each other
Nagaland Accident : काळ बनून आला दगड; एका क्षणात तीन गाड्यांना जागीच चिरडलं! भीषण Video Viral
चक्काचूर झालेली धुळ्याच्या खंडेलवाल कुटुंबाची कार.
चक्काचूर झालेली धुळ्याच्या खंडेलवाल कुटुंबाची कार.esakal

नियंत्रण कक्षाची स्थापना

जखमींवर योग्य ते उपचार करण्यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार महेंद्र माळी यांनीही उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.

दरम्यान, अपघातानंतर शिरपूर तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, तेथे नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर व महसूल सहाय्यक नितीन भोजने यांची नियुक्ती करण्यात आली.

JCB separated the accident vehicles from each other
Dhule Accident Video : ब्रेक फेल होऊन हॉटेलमध्ये घुसला कंटेनर अन्…; भीषण अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com