Dhule Crime News : मालपूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ; 3 बंद घरांत हातसफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thieves broke the cupboard in a closed house and threw away the material.

Dhule Crime News : मालपूर येथे चोरट्यांचा धुमाकूळ; 3 बंद घरांत हातसफाई

दोंडाईचा (जि. धुळे): चोरट्यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागातील खेडेगावात वळविला आहे. एकाच रात्री तीन बंद घरांत डल्ला मारून चोरटे पसार झाले.

मालपूर (ता. शिंदखेडा) येथील राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त वाहक छोटू फकिरा ठाकरे यांच्या बंद घरात चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. (Thieves burglary three locked houses one night Dhule crime news)

सुमारे एक लाख रुपयांची घरफोडी झाली असावी असा अंदाज आहे. शेजारच्या घरातही चोरटे घुसत असतानाच घरमालकला जाग आली. तेव्हा घरमालक व चोरट्यांमध्ये झटापट झाली. त्यात नाना पाटील कासोदेकर यांचे दोन दात पडले.

रात्री अडीचच्या सुमारास चोरटे पसार झाले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रथमच चोरट्याने एवढी मोठी हिंमत गावात केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास मालपूर येथे चोरी झाली. महादेव मंदिर परिसरातील राजमार्गावरील भरवस्तीतील छोटू ठाकरे यांचे घर आहे. ते परिवारासह तीन दिवसांपासून मुलांकडे गुजरातकडे गेले होते. चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेतला.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Grapes Season : जिल्ह्यातील द्राक्षहंगामाचा श्रीगणेशा! फेब्रुवारीत गती येणार

कपाटातील सामान अस्ताव्यस्त केले होते. चाळीस हजारांची रोकड व एक तोळा सोन्याचे दागिने गेल्याचा अंदाज आहे. नेमकी काय चोरी झाली हे श्री. ठाकरे आल्यावरच कळेल. दरम्यान, मोठा मुलगा दीपक ठाकरे नंदुरबारहून घटनेची माहिती मिळताच आले. त्यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यातील पोलिसांना बोलावून पंचनामा केला.

योगेश संतोष यांच्या घरातूनही दोन हजार रुपये चोरीस गेले, तर एका घरातून शंभर रुपये चोरीस गेले. नाना पाटील यांच्या घरात चोरटे शिरले असता त्यांना जाग आली. तेव्हा मात्र झटापट झाली. त्यात त्यांना दोन दात गमवावे लागले.

चार जण होते. हातात लाकडी दांडके होते. ते अमरावती नदीकडे पसार झाल्याचे पाटील यांनी सांगितले. येथे पहिल्यांदाच मोठी धाडसी चोरी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हेही वाचा: Nashik Crime News : पंचवटी खुनातील अल्पवयीन सुधारगृहात

टॅग्स :Dhulecrimerobbery