
ABHA Health Card : हजारावर आभा कार्डची नोंदणी; नगरसेवक नवले, उगलेंच्या प्रयत्नांना प्रतिसाद
धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक सतरामध्ये आयुष्मान भारत योजना नोंदणी व कार्ड वाटपाचा मोफत उपक्रम सुरू आहे.
पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. १८) हजारावर आभा कार्डची (ABHA Health Card) नोंदणी झाली. (thousand people Registration of Abha card under Ayushman Bharat Scheme dhule news)
नगरसेविका सुरेखा उगले आणि नगरसेवक शीतल नवले यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या उपक्रमास प्रतिसाद लाभत आहे. मिल परिसरातील स्वराज्य जिमखाना येथे उपक्रमाला सुरवात झाली. नोंदणीसाठी रांगा लागल्या. भाजपचे कार्यकर्ते योजनेच्या लाभार्थ्यांना घरोघरी नोंदणी पावत्या वितरित करत आहेत.
हा उपक्रम दोन दिवस सुरु असेल. त्यासाठी लाभार्थ्यांनी स्वराज्य जिमखाना येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहापर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेवकांनी केले.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
माजी नगरसेवक तुषार पाटील, विकास बाबर, जितू इखे, प्रशांत नवले, सोनू उगले, जयेश माळी, बबलू पाटील, किरण गुरव, भय्या पाकळे, विकी जाधव, दुर्गेश पाटील, सुनील चौधरी, दिग्विजय गाळणकर, गणेश दशपुते आदी उपस्थित होते.