Saptshringi Devi Chaitrotsav : हजारो भाविक सप्तशृंगगडाकडे; शहरात वाजतगाजत निरोप देण्याची प्रथा

Chariot of Jai Mata Di Padayatra Committee set out on Thursday for Shree Saptasringi Yatra along with devotees.
Chariot of Jai Mata Di Padayatra Committee set out on Thursday for Shree Saptasringi Yatra along with devotees. esakal

शिरपूर (जि.धूळे) : वणी (नांदुरी) येथील गडावर श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सव (saptshringi Devi Chaitrotsav) व दर्शनासाठी श्री रामनवमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. ३०) शहर आणि परिसरातून हजारो भाविक रवाना झाले. (Thousands of devotees leave for Chitrotsava and darshan of Shri Saptashrungi Devi on March 30 dhule news)

पदयात्रेतील यात्रेकरूंना वाजतगाजत निरोप देण्याची शिरपूरमध्ये प्रथा आहे. यात्रेकरूंच्या घरापासून ढोल, ताशे, डीजे, बँडच्या तालावर देवीच्या स्तुतीची गीते गात मिरवणूक काढण्यात आली. अरुणावती नदीकाठावरील श्री खंडेराव मंदिराजवळ असलेल्या शहराच्या सीमेवर यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरपूर ते नांदुरी गडापर्यंत पदयात्रेची तब्बल २९ वर्षांची परंपरा असलेल्या जय माता दी पदयात्रा समितीच्या रथासोबत हजारो भाविक सायंकाळी पदयात्रेने रवाना झाले. कुंभारटेक ते खंडेराव मंदिर हा मार्ग समितीची मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा गर्दीने भरून गेला होता. समितीतर्फे सजविलेल्या रथासह देवीच्या प्रतिमेची संजय चौधरी यांनी सपत्नीक महाआरती केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Chariot of Jai Mata Di Padayatra Committee set out on Thursday for Shree Saptasringi Yatra along with devotees.
NMC Water Supply : नाशिककरांना भरावे लागणार नळजोडणीसाठी अतिरिक्त शुल्क!

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे आदी उपस्थित होते. रथाचे मानकरी बाबूराव चौधरी, जयवंताबाई चौधरी यांनी प्रसादवाटप आबा चौधरी, कन्हय्या चौधरी व पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. देवीच्या रथासोबत येथील नामांकित बजरंग बँड रवाना झाला.

‘डोंगर हिरवागार’, ‘भाऊ मना सम्राट’, ‘माय तुनं माहेर बेटावद’ अशा गाजलेल्या गीतांवर युवकांनी ठेका धरला. नरडाणा, धुळे, झोडगे, दरेगाव, मालेगाव, दाभाडी, आघार, लखमापूर, ब्राह्मणगाव, ठेंगोडा, लोहोणेर, विठेवाडी, कळवणमार्गे ४ एप्रिलला चतुर्दशीला यात्रा मानाच्या रथासह सप्तशृंगगडावर पोचेल.

Chariot of Jai Mata Di Padayatra Committee set out on Thursday for Shree Saptasringi Yatra along with devotees.
Water Reduction Model : पाणी कपातीचे ‘नाशिक मॉडेल’ राज्यभरात; एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंमलबजावणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com