Dhule News : जिल्ह्यात महसूल विभागाच्या 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
Transfer News
Transfer News esakal

Dhule News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महसूल व वन विभागाने शुक्रवारी (ता. २) बदल्यांचे आदेश काढले. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील महसूल विभागातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. (Transfer of 5 officers of revenue department in dhule district news)

एकाच पदावर तीन वर्षे व त्याहून अधिक कार्यकाळ असलेल्या तसेच स्वजिल्ह्यात नियुक्त अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये धुळे येथील भूसंपादन क्रमांक-१ च्या रिक्तपदी नाशिक विभागीय पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सुरेखा जाधव यांची नाशिक येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी नंदुरबारचे सरदार सरोवर प्रकल्प व गानिप्रचे सचिव संजय बागडे यांची नियुक्ती झाली आहे.

Transfer News
Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

भूसंपादन अधिकारी संदीप पाटील यांची उपजिल्हाधिकारी (प्रशासन) पदी बदली झाली. त्यांच्या जागेवर नगरच्या उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांची नियुक्ती झाली. धुळे तहसीलदार (संगायो) आशा गांगुर्डे यांची पेठ येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी दिंडोरीचे पंकजकुमार पवार यांची नियुक्ती झाली आहे.

दोंडाईचाचे अपर तहसीलदार राजेंद्र मोरे यांची अक्कलकुवा तहसीलदारपदी, धुळे शहराचे अपर तहसीलदार विनोद पाटील यांची जळगाव येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदारपदी बदली झाली. त्यांच्या जागी नंदुरबारच्या वैशाली हिंगे यांची नियुक्ती झाली.

Transfer News
Dhule News : विश्‍वनाथ येथे 3 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ; विविध योजनांतून निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com