जळगाव : खोटेनगरातून मोबाईल लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mobile theft

खोटेनगरातून मोबाईल लंपास

जळगाव : शहरातील खोटेनगरातील हिरा गौरी पार्क येथे अंगणात झोपलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचा उशाशी ठेवलेले दोन मोबाईल चोरीला गेले. जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हिरागौरी पार्क येथे किरण प्रेमलाल चौधरी (वय ३४) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. चौधरी पितापुत्र अंगणात खाट टाकून झोपले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या उशाशी ठेवलेले दोन मोबाईल आढळून आले नाही. चोरीची खात्री झाल्यावर किरण चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून ९ हजारांचे दोन मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: देशीचे गोदाम फोडून विदेशीवर उडवला पैसा; चोरट्यांची टोळी गजाआड

Web Title: Two Mobile Phones Stolen In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrimemobilethief
go to top