Dhule Crime News : अवैध 14 जनावरांची वाहतूक करणारे दोन Pick-Upपकडले

crime news
crime newsesakal

Dhule News : दोंडाईचा पोलिसांनी अवैधरीत्या १४ जनावरांची वाहतूक करणारे पिक-अप वाहन पकडले असून जनावरांना गोशाळेत जाणारे सोडण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना सकाळी आठ ते दहाच्या सुमारास नंदुरबार चौफुलीकडून धुळे चौफुलीकडे बायपास रस्त्याने पिक-अप वाहनाद्वारे जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.(Two pickups caught transporting 14 animals illegally Dhule Crime News)

पोलिस पथकाने सापळा रचत पिक-अप वाहन (एमएच ०४, ईएल ४९३५) व(एमएच ०४, बीएस २३१२) आणि सदर वाहनाचे पुढे पायलटींग करणारे चारचाकी वाहन अशांचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना सदर वाहनावरील वाहन चालक वाहन मालक आणि जनावरांचा मालक असे मोहम्मदियानगर जवळील झाडाझुडपांमध्ये वाहन उभे करून पळून गेले.

दोन्ही पिक-अप वाहन प्रत्येकी ३ लाख रुपयेप्रमाणे सहा लाख रुपये आणि चारचाकी वाहन साडेतीन लाख व पिकअप वाहनातील १४ जनावरांची किंमत एक लाख ७८ हजार रुपये असा एकूण अकरा लाख २८ हजार रुपये रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास राजन दुसाने हे करीत आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे, उमेश चव्हाण, योगेश पाटील, प्रवीण धनगर, साबीर शेख, निर्मल बंजारी, नरेंद्र शिरसाट यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Dhule Crime : शेती अवजारे चोरणारी टोळी जेरबंद; कोचीत जाणारी सुगंधित तंबाखू पकडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com