Dhule Crime News : सव्वाचार लाखांच्या दुचाकी हस्तगत; दुचाकी चोरट्यांना ट्रॅप लावून ठोकल्या बेड्या

श्री भाऊसाहेब हिरे मेडिकलसह शहरात वर्दळीच्या ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या धुळ्यातील टोळीला ‘एलसीबी’ पथकाने ट्रॅप लावून बेड्या ठोकल्या.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Dattatray Shinde of LCB and the team along with the bikes seized from the thieves.
Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Dattatray Shinde of LCB and the team along with the bikes seized from the thieves.esakal

Dhule Crime News : येथील श्री भाऊसाहेब हिरे मेडिकलसह शहरात वर्दळीच्या ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या धुळ्यातील टोळीला ‘एलसीबी’ पथकाने ट्रॅप लावून बेड्या ठोकल्या. शिवाय पथकाने चोरट्यांकडून चार लाख ३० हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकीदेखील हस्तगत केल्या.

या टोळीच्या नावावर धुळे शहर, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. (Two wheeler thieves seized with worth 174 lakhs were trapped and shackled by police dhule crime news)

दह्याणे (ता. धुळे) येथील रवींद्र देवीदास मराठे या शेतकऱ्याची दुचाकी (एमएच १८, एई ५७९२) २६ जानेवारीला रात्री साडेनऊ ते साडेदहादरम्यान श्री. भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजच्या आवारातून चोरीस गेली.

त्याबाबत त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या पथकाला हिरे मेडिकलसह रुग्णालय परिसरात ट्रॅप लावून संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

तसेच कफिल अन्सारी व तोसिफ शेख यांनी दुचाकी चोरली असून, ते चोरीच्या दुचाकीसह वडजाई रोड चौफुली येथे उभे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक शिंदे यांना मिळाली.

Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Dattatray Shinde of LCB and the team along with the bikes seized from the thieves.
Nashik Crime News : बोगस त्वचारोग तज्ञाचं फुटलं बिंग; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

त्यामुळे त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. एलसीबी पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी कफिल अहमद शकील अहमद अन्सारी (वय २०, रा. मौलवीगंज, धुळे) व तौसिफ शेख गुलाम मोहम्मद (३२, रा. तिरंगा चौक, धुळे) या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनिस मन्यार (रा. दिलदारनगर, धुळे) व त्याच्या साथीदाराच्या मदतीने हिरे मेडिकल कॉलेज व धुळे शहरातून यापूर्वी दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चार लाख ३० हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी पथकाने हस्तगत केल्या.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे, प्रकाश पाटील, कैलास दामोदर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, श्याम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, योगेश साळवे, गुणवंत पाटील, सुशील शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Superintendent of Police Shrikant Dhiware, Police Inspector Dattatray Shinde of LCB and the team along with the bikes seized from the thieves.
Nashik Crime News : सर, तो मुलगा मला खूप त्रास देतो! आयुक्तांच्या व्हॉटसॲपवर मेसेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com