esakal | Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे

- अजित पवारांचे रडणे म्हणजे तमाशा

- पार्सल परत पाठवून द्या

Vidhan Sabha 2019 : पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला : राज्यात युतीचे सरकार येणार पण तुम्ही आमच्याशी वागले तरी आम्ही सुडाने वागणार नाही. सूड-आसूड याचा फरक आम्हाला कळतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शरद पवार यांच्यावर टीका केली.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ येथे आज सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर खा. संजय राऊत, शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, किती दिवस पाटपाण्याचे प्रश्न लावून धरणार आहात. तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक असून, माझ्यासाठी नव्हे तुमच्या हक्कांचा आमदार निवडून द्यायचा आहे. एवढे एकत्र येऊन कर्तृत्व बजावत नसाल तर तुमचं तुम्ही ठरवा.

Vidhan Sabha 2019 : भाजपकडून मेगाभरतीचा गाजावाजा पण बंडखोर आमदारांचे काय

तसेच ते पुढे म्हणाले, माझ्या वचनानाम्याला मी बांधील असून, मी शपथ घेतली आहे. त्यातील प्रत्येक आश्वासन मी पूर्ण करणार आहे. तुम्हाला आनंदाचा काळ थकलेले नाही देणार तर युतीच देणार आहे. यांच्याकडे राहिलंय कोण? आता झोपलात तर उठवायला कोण नाही म्हणून गद्दाराला गाडत संभाजी पवार विधानसभेत पाठवा.

अजित पवारांचे रडणे म्हणजे तमाशा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गळे काढून रडले. पण हा तमाशा होता. पवारांचे रडणे म्हणजे त्यांच्या कर्माचे फळ असून चौकशीचा ससेमिरा मागे लागला म्हणून युतीच्या नावाने बोटे मोडताय पण आता न्यायाचे राज्य, चौकशीच होणारच आहे. 

Vidhan Sabha 2019 :..तर अजित पवारांनी माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी

पार्सल परत पाठवून द्या

इथं विकासाचा वचनानामा करावा लागला. मग इथला सत्तेतला आमदार काय करत होता. आता वेळ आली आहे, इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल परत पाठवून द्या. पण कुठेही पाठवा, मुंबईत पाठवू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला.