Unseasonal Rain : अवकाळी अन् गारपिटीने मेंढपाळांचा जीव मुठीत

Sheep resting in a field.
Sheep resting in a field. esakal

Dhule News : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मेंढपाळ मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळा संपल्यानंतर व दिवाळीनंतर मेंढपाळ चराईसाठी भटकंतीला निघतात.

हे मेंढपाळ जिल्ह्यासह अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणाग, चाळीसगाव तालुक्यात मेंढ्यांच्या चराईसाठी भटकंती करीत असतात. (unseasonal rain and hail Shepherds were affected dhule news)

हे मेंढपाळ अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अधिक त्रस्त झाले आहेत. बऱ्याचशा मेंढ्या मृत्युमुखीही पडल्या आहेत. मेंढपाळांचे मोठे नुकसान होत आहे. अद्यापही अवकाळीचा अंदाज व्यक्त होत असल्याने, मेंढपाळांचा जीव धस्स झाला आहे. जीव मुठीत घेऊन ते जगत आहेत.

मेंढ्या मृत्युमुखी

परिसरात ४ एप्रिलपासून ४ मेपर्यंत आठ वेळा अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याचा वारा, मुसळधार धारा आणि सोबत गारा यामुळे पशुपक्ष्यांना मोठा फटका बसला. मेंढपाळांची उन्हाळ्यात चाऱ्यासाठी जंगलातच भटकंती सुरू असते. त्यांना अवकाळीचा उघड्या शिवारातच सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sheep resting in a field.
Unseasonal Rain Crop Damage : पावणे 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जिल्ह्यातील बहुतांश मेंढपाळांच्या प्रत्येकी सरासरी चार मेंढ्या दगावल्या आहेत. त्यांचा ना पंचनामा ना कोणता अधिकारी त्यांच्यापर्यंत पोचला आहे. विखुरलेल्या मेंढपाळांची समस्या शासनदरबारी कोण मांडेल, असा प्रश्न मेंढपाळांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अवकाळीचा अंदाज पुन्हा ६ ते १० मेपर्यंत व्यक्त झाला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. खानदेशात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांमधून भीती व्यक्त होत आहे.

जीव मुठीत घेऊन सामना..!

गावात व शहरात राहणाऱ्या मंडळींचीही अचानकच्या पावसाने त्रेधातिरपीट उडते. अशा स्थितीत जंगलातील मेंढपाळ जीव मुठीत धरूनच वावरत आहेत. त्यांना हवामान अंदाज माहिती असूनही किंवा कळत असूनही, चाऱ्यासाठी भटकंती अनिवार्यच आहे. उघड्यावरील वाडा अन् आडोशाला बैलगाडी याच्यात बचाव अशक्यच आहे. मेंढपाळ अवकाळीने पुरते त्रस्त झाले आहेत.

Sheep resting in a field.
Kharif Season : खरीप हंगामासाठी 1 लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com