Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह गारपीट; अवकाळी पावसाचा कहर थांबता थांबेना!
नंदुरबार : अवकाळी पावसाचा कहर थांबता थांबेना असे चित्र सध्या आहे. या अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडातील घास हिरावून पुन्हा पीक नुकसानीचे संकट मानगुटीवर बसले आहे.
आज पुन्हा चौथ्यांदा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. (Unseasonal rain loss of first crop was not recorded but rain again caused more damage nandurbar news)
त्यामुळे पहिल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तोच पुन्हा पावसाची हजेरी लागून आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाला वैतागले आहेत. संप सुरू असल्याने पंचनामेही लांबणीवर पडले आहेत. तोच आज पुन्हा चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह काही भागात गारांचा पाऊस झाला.
मागील आठवड्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा कांदा, मिरची, पपई, टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून जनावरे दगावले आहेत. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महसूल कर्मचारी त्या नुकसानीचे पंचनामे करत असतानाच बुधवारी पुन्हा वादळ वाऱ्यासह पाऊस झाला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
मागील आठवड्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा कांदा, मिरची, पपई, टरबूज पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून जनावरे दगावले आहेत. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महसूल कर्मचारी त्या नुकसानीचे पंचनामे करत असतानाच बुधवारी पुन्हा वादळ वाऱ्यासह पाऊस झाला.
त्यातही प्रचंड नुकसान झाले. शुक्रवारी (ता. १७) पुन्हा हवामान खात्याचा अंदाजानुसार सायंकाळी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह काही भागात गारा पडल्या. आठवड्यात चार वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेले पिकांचे नुकसान झाले आहे. पहिल्याच पंचनामा होत नाही तोच पुन्हा दुसऱ्या पावसामुळे नुकसान शेतकरी पिके वाचवेल तरी किती? असा प्रश्न उपस्थित होतो.
ऋतू कोणता तोच कळेना
सध्या हवामानातील बदल व वातावरणाचा विचार केला तर ऋतू कोणता सुरू आहे, हेच कळेना असे चित्र आहे. हिवाळा संपून महिना उलटला अन् उन्हाळा सुरू झाला. तरीही रात्री थंडी व दिवसा ऊन असे चित्र होते. आता तर तिन्ही ऋतूंचा प्रत्यय लोकांना येत आहेत. रात्री थंडी, दिवसा ऊन व सायंकाळी पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे सध्या उन्हाळा, हिवाळा की मग पावसाळा सुरू आहे. हेच कळेना असे चित्र आहे.