Dhule News : पळासनेरला 3 कोटींच्या निधीतून जलकुंभ, पाइपलाइन

पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता सध्या येणाऱ्या काळात पाणी जपून वापरावे, पाणी कितीही असले तरीसुद्धा पाण्याची समस्या अत्यावशक समस्यांमध्ये येते.
MLA Kashiram Pavara and Vice President Devendra Patil during the Bhoomi Puja of the new water tank and pipeline
MLA Kashiram Pavara and Vice President Devendra Patil during the Bhoomi Puja of the new water tank and pipelineesakal

Dhule News : पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता सध्या येणाऱ्या काळात पाणी जपून वापरावे, पाणी कितीही असले तरीसुद्धा पाण्याची समस्या अत्यावशक समस्यांमध्ये येते. शिरपूर तालुक्यासह पळासनेरवासीयांच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धुळे-नंदुरबार विधान परिषदचे आमदार अमरिशभाई पटेल.

माजी शिरपूर नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे आमदार काशीराम पावरा यांनी सांगितले. (Water pipelines to Palasner with fund of 3 crores dhule news)

पळासनेर (ता. शिरपूर) येथील जलजीवन मिशनअंतर्गत नवीन जलकुंभ उभारणे व पाइपलाइन करण्यासाठी एक कोटी ७२ लाख रुपये व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत एक कोटी २० लाख रुपये महामार्ग एनएच३ पासून ते चत्तरसिंगपाडा रस्ता सुधारणा डांबरीकरणकामाचे भूमिपूजन आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयवंत पाडवी, पंचायत समिती सदस्य मानसिंग पावरा, लोकनियुक्त सरपंच शीतल छोटू कोळी, उपसरपंच राजू भिल, ग्रामपंचायत सदस्य छोटू कोळी यांची उपस्थिती होती.

गावात पाण्याची थोडीफार बऱ्याच वर्षांपासून पाण्याची टंचाई होती. त्यासाठी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून अजून एक पाण्याची टाकी असावी, अशी मागणी होती.

हे लक्षात घेऊन सरपंच शीतल कोळी व ग्रामपंचायत प्रभारी छोटू कोळी यांनी दखल घेऊन धुळे-नंदुरबार विधान परिषदचे अमरिशभाई पटेल, माजी शिरपूर नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

MLA Kashiram Pavara and Vice President Devendra Patil during the Bhoomi Puja of the new water tank and pipeline
Dhule News : विश्‍वनाथ येथे 3 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ; विविध योजनांतून निधी

नवीन पाण्याची टाकी व पाइपलाइनसाठी महाराष्ट्र शासण जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून एक कोटी ७२ लाख रुपये व महामार्ग एनएच ३ पासून सत्तरसिंगपाडा रस्ता सुधारणा महाराष्ट्र शासन ग्रामसडक योजनेंतर्गत एक कोटी २० लाख रुपयांचा निधी धुळे-नंदुरबार विधान परिषदचे आमदार अमरिशभाई पटेल.

माजी शिरपूर नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले. या वेळी सुरत भिल, कैलास पावरा, धर्मेंद्र गिरासे, शिवाजी चारण, किशोर चित्ते, ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश बोरसे, सुनील पावरा, सुभाष शिंदे, संजय सिंग गिरासे.

गुलाबराव पाटील, मनीष गिरासे, भीमसिंग राजपूत, योगेश माळी, सुदाम भिल, गणपत जाट, रामकिशोर यादव, अशोक महाले, दीपक कोठावदे, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. एस. आर. पाटील, सतीश सोनवणे, रहीम पिंजारी, महेंद्र कोळी, मिलिंद सोनकांबळे, प्रभू चारण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

MLA Kashiram Pavara and Vice President Devendra Patil during the Bhoomi Puja of the new water tank and pipeline
Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com