Wild Vegetable Competition 2023 : ग्रामस्थांच्या एकीतून वनौषधी भाज्या, जंगलाचे संरक्षण अन्‌ संवर्धन!

Baripada
Baripadaesakal

Wild Vegetable Competition 2023 : निसर्ग पर्यटन व भटकंतीसाठी पर्यटकांना आदर्श बारीपाडा (ता. साक्री) खुणावत असते. देशातीलच नव्हे, तर परदेशातील निसर्गप्रेमी पर्यटक, अभ्यासकांची पावले या आदिवासीबहुल गावाकडे वळत असतात.

धुळे शहरापासून पश्‍चिमेला आणि साक्रीपासून १६ किलोमीटरवर स्वयंनिर्भर बारीपाडा पावसाळ्यासह हिवाळ्यात पर्यटनासाठी उत्तम मानले जाते. त्यात वनभाजी स्पर्धा आनंदाचा कळस ठरत असते.

यंदा पर्यटन विभागाच्या सहकार्याने रविवारी (ता. २७) होणारी ही स्पर्धा खवय्यांनाही खुणावत आहे. (Wild Vegetable Competition 2023 on 27 august in dhule news)

बारीपाड्यात १९ वर्षांची परंपरा लाभलेल्या वनभाजी पाककला स्पर्धा- २०२३ साठी यंदा पंचक्रोशीतून ६५ आदिवासी महिलांनी नावनोंदणी केली आहे. त्यात मोहगाव, बारिपाडा, मोगरपाडा, मापलगाव, चावडीपाडा, मांजरी, मतकुपीपाडा येथील आदिवासी सुगरणी सरसावल्या आहेत.

नोंदणीसाठी नाममात्र शंभर रुपये शुल्क असून, सहभागी स्पर्धक महिलांना हमखास बक्षिसे दिली जातात. इच्छुक महिलांनी बारीपाडा येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन आदर्श बारीपाड्याचे शिल्पकार चैत्राम पवार, अविनाश पवार, अनिल पवार, साहेबराव पवार आदींनी केले.

ग्रामस्थांची आदर्शवत एकी

बारीपाडा ग्रामस्थांनी शेकडो एकरमधील जंगलाचे संरक्षण केले आहे. ते आदर्शवत एकीमुळे शक्‍य झाले. बारीपाडा ग्रामस्थ आळीपाळीने जंगलाचे संरक्षण करतात. त्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून दगडीबांध, मातीबांध बांधले आहेत. त्यामुळे बारीपाडा येथील भूजल पातळी उंचावली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Baripada
Rain Wild Vegetable : पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या दाखल; हादगा, कटुर्ली, कुलुची भाज्यांना मागणी

वनक्षेत्रात विविध प्रकारच्या वनौषधी, सागवान मोठ्या प्रमाणावर आहे. डोंगराळी भागात वसलेले, बंधाऱ्यांमुळे जलसाठा, पावसाळ्यात धबधबे, निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना बारीपाडा खुणावत असते. या उपक्रम व प्रयोगशील गावात अनेकविध उपक्रम सुरू असतात.

१९९२ पासून वनसंरक्षण सुरू करताना कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, वृक्षारोपण, सीसीटी, श्रमदानातून ४५० ते ५५० लहान-मोठे दगडीबांध, ३९ ते ३५ मातीबांध, पाझर तलाव, लाख उत्पादन, मधुमक्षिका पालन, घरोघरी वृक्षलागवड, परसबाग, वनभाजी स्पर्धा, सुधारित चारसूत्री भातलागवड, बटाटा लागवड, स्ट्रॉबेरी लागवड, गुलाब शेती असे अनेक उपक्रम बारीपाड्यात राबविले जातात. चैत्राम पवार यांच्या नेतृत्वात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनाचा विडा या गावाने निष्ठेने उचलला आहे.

वनभाजी पाककला स्पर्धा

असे असताना बारीपाड्यासह पंचक्रोशीतील आदिवासी महिलांच्या गुणवैशिष्टांना वाव मिळावा म्हणून १९ वर्षांपासून वनभाजी पाककला स्पर्धा घेतली जात आहे. तिला यंदा पर्यटन संचालनालयाची जोड मिळाली आहे.

Baripada
Wild Vegetable : रानभाज्यांपासून सुरगाण्याचा आयुर्वेदिक चहा; सर्दी, खोकला, ॲसिडिटी, हिवताप, डोकेदुखीवर गुणकारी

या विभागासह बारीपाडा जैवविविधता संरक्षण समितीतर्फे आणि देवगिरी आश्रमाच्या माध्यमातून ग्राम विकासाच्या संकल्पनेला चालना देताना वनभाजी पाककला स्पर्धेतून आदिवासी महिलांना व्यासपीठ मिळाले आहे.

बारिपाडा ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे संरक्षित ११० वनौषधी भाज्यांची माहिती देशविदेशाला मिळत असते. अशा या वनभाजी स्पर्धेत महिलांचा सहभागही लक्षणीय असतो. यंदा रविवारी (ता. २७) होणाऱ्या स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. तत्पूर्वी, शनिवारी (ता. २६) सकाळी जनजाती योध्दा प्रदर्शनी, श्री धान्य (भरड धान्य) प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

बारीपाडा येथे कसे पोचावे?

धुळे, नंदुरबार, जळगावकडून साक्री तालुक्यातील पिंपळनेरमार्गे वार्सा, तेथून बारीपाडा, नाशिककडून साक्री तालुक्यातील पिंपळनेरमार्गे वार्सा व तेथून बारीपाड्यास जाता येते. अधिक माहितीसाठी पर्यटकांनी बारीपाडा येथील अनिल मोतिराम पवार (मो. ९१३०६ ७८३०१), साहेबराव देवचंद पवार (९८२२२ ८२०३९), पिंपळनेर येथील माधव पवार (९४०५२ ०३००२) यांच्याशी संपर्क साधावा.

Baripada
Dhule News : आदिवासी सुगरणींकडून पाककौशल्याचे दर्शन; खवय्यांसाठी खमंग आस्वादाची पर्वणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com