Winter Cold : सातपुडा पर्वतावर दवबिंदू गोठले; तापमानात मोठी घट

Satpuda mountain
Satpuda mountainesakal

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत असलेल्या डाब वालंबा (ता. अक्कलकुवा) परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने दवबिंदू गोठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा थंडीच्या तीव्रतेमुळे असा प्रकार घडला आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील दाब व वालंबा गावाच्या परिसर हा सातपुडा पर्वतापासून खोलगट भागात आहे. या परिसरात नेहमीच थंडीचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसात या ठिकाणी दवबिंदू मोठ्या प्रमाणात पडतात. मागे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे गार वातावरण तयार होऊन या ठिकाणी दवबिंदू गोठले गेले होते.

Satpuda mountain
Winter Session : थंडीत पायमोजे घालून झोपताय ? मग आत्ताच सावध व्हा !

सकाळी उठल्यावर थंडीच्या तडाका तीव्र होता त्याचवेळी वालंबा परिसरातील ग्रामस्थ घराबाहेर पडल्यावर परिसरातील गवतावर असलेले दवबिंदू गोठल्याचे चित्र दिसून आले. गवतावरील दवबिंदू गोठल्यामुळे बर्फाच्छादित पांढरेशुभ्र बर्फाचे कण दिसून आले. थंडीचे प्रमाण शेवटच्या टप्प्यात वाढले आहे.

स्थानिक नागरिकांनी दवबिंदू गोठल्याच्या घटनेला पुष्टी दिली आहे. येथील तापमान चार ते पाच अंशांवर आले होते. असेच चित्र सकाळी तोरणमाळ परिसरात निर्माण झाले होते, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

Satpuda mountain
Winter Health : हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढतो?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com