दारूबंदीसाठी म्हसदीत महिला आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

म्हसदी : गावात तत्काळ दारूबंदी करावी, अशी एकमुखी मागणी आज सकाळी आक्रमक महिलांनी ग्रामसभेत केली. यानंतर अवैध व्यवसाय व दारूबंदीचा ग्रामसभेत ठराव झाला. दरम्यान, केवळ ठराव न करता तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असा आग्रह महिलांनी धरला.

म्हसदी : गावात तत्काळ दारूबंदी करावी, अशी एकमुखी मागणी आज सकाळी आक्रमक महिलांनी ग्रामसभेत केली. यानंतर अवैध व्यवसाय व दारूबंदीचा ग्रामसभेत ठराव झाला. दरम्यान, केवळ ठराव न करता तत्काळ कार्यवाही सुरू करावी, असा आग्रह महिलांनी धरला.

येथील गांधी चौकातील मंगल कार्यालयात आज सकाळी महिला ग्रामसभा झाली. सरपंच कुंदन देवरे अध्यक्षस्थानी होते. उपसरपंच रत्नाबाई माळीच, ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव देवरे, गंगाराम देवरे, गंगाराम गायकवाड, यशवंत गायकवाड, सदस्या वंदना देवरे, नबाबाई अहिरे, हुसेनाबी पिंजारी, पोलिसपाटील पोपटराव देवरे, ग्रामविकास अधिकारी मेघश्याझम बोरसे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा भामरे, मनीषा अहिरे उपस्थित होते. ग्रामसभेत 40 बचत गटांच्या अध्यक्षा, सचिवांसह गावातील महिलांनी सहभाग घेतला.

रस्ता दुरुस्तीसाठीचे आमदारांचे आंदोलन स्थगित

ग्रामसभेत माझी कन्या भाग्यश्री योजना, ग्राम सुरक्षा दल स्थापन करणे, मुलींचा घटता जन्मदर, 15 वा वित्त आयोग, वार्षिक विकास आराखडा तयार करणे, मातृवंदन योजना आदी विषयांवर चर्चा झाली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे घ्यावीत, ग्राम संघासाठी जागा द्यावी अशा मागण्याही महिलांनी केल्या. सध्या मुबलक पाणी असले, तरी काटकसरीने वापर करा, नळांना तोट्या बसवा, असे आवाहन सरपंच देवरे यांनी केले. महिलांची सार्वजनिक शौचालये स्वच्छ करावीत, ठराविक गल्लीत सुसाट धावणाऱ्या ट्रॅक्टेरसह अन्य वाहनांना प्रतिबंध करावा, अशी मागणी झाली. पल्लवी देवरे, वैशाली देवरे, चेतना ह्याळीस, पद्मलता देवरे, प्रतिभा मोहिते आदींनी चर्चेत भाग घेतला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womans Demand to ban liquer in mhasdi