पाय गमावलेल्या योगेशला रत्नप्रभा ट्रस्टमुळे उभारी

दगडवाडी - येथील योगेश मधे या विद्यार्थ्याला मुंबईच्या रत्नप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने दिलेला जयपूर फूट.
दगडवाडी - येथील योगेश मधे या विद्यार्थ्याला मुंबईच्या रत्नप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने दिलेला जयपूर फूट.

इगतपुरी - घरात अठराविश्‍व दारिद्र्य आणि त्यात एखादा कटू प्रसंग उद्‌भवला, तर त्यासारखं दुर्दैव नसावं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं आणि ध्यानीमनी नसताना विपरीत घडून जातं. असाच अनुभव त्रिंगलवाडीजवळील दगडवाडीत आला.

आई-वडील रोज मोलमजुरी करतात म्हणून कुटुंबाला मदत करणाऱ्या शाळकरी मुलाला आपला एक पाय गमवावा लागला. आता त्याच मुलाला मुंबईच्या रत्नप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने जयपूर फूट देऊन पुन्हा चालण्याबरोबरच जगण्याची उभारी दिली आहे.

आई-वडील रोज मोलमजुरी करतात. त्यांना मदत व्हावी या उद्देशाने शेळ्या चारण्यासाठी डोंगरावर गेलेला योगेश मधे डोंगरावर शेळ्या चारत असताना एक मोठा दगड त्याच्या डाव्या पायावर येऊन धडकला. काही कळायच्या आतच पाय दगडाखाली दाबला गेला. त्यामुळे त्याला हालचाल करणेसुद्धा शक्‍य झाले नाही. मदतीसाठी आरडाओरड केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात अठराविश्‍व दारीद्य्र आणि त्यात हा बाका प्रसंग उद्‌भवला. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांचे अवसान गळाले. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी वेळ गेला आणि येथेच दुर्दैवाचा फेरा आला. पायावर दगडाचा मार आणि त्यात खोलवर जखम झाल्याने योगेशला उभं राहणंसुद्धा शक्‍य होत नव्हतं. उपचारांसाठी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत जखम चिघळली होती. डॉक्‍टरांनी सर्व तपासण्या केल्यावर लक्षात आले, की गुडघ्याखालील भागाच्या हाडांचा चुरा झाल्याने हाड जुळवणं शक्‍य नव्हते. त्यामुळे गुडघ्याखालचा भाग काढावा लागला.

अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा आणि अनास्थामुळे एकुलत्या एक मुलाचा पाय काढावा लागल्यामुळे मधे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. यावर मात करण्यासाठी मुख्याध्यापक गोरखनाथ परदेशी व शिक्षक विजय पगारे यांनी प्रयत्न करून योगेश रोज शाळेत यायला पाहिजे, या उद्देशाने मुंबईच्या रत्नप्रभा चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधला. अपेक्षित फलश्रुती मिळाली व ट्रस्टने जयपूर फूट लावून पुन्हा चालण्याबरोबरच जगण्याची उभारी योगेशला दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com