कर्जफेडीच्या विवंचनेत तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer suicide
Farmer suicideesakal

चिमठाणे (जि. धुळे) : भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. पण सततच्या वातावरण बदलामूळे लागवडीपासून ते पिक काढणीपर्यंत असे सर्वच चक्र बदलतेय. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत, अशावेळी घेतलेलं कर्ज फेडणं देखील अवघड होऊन बसतं. परिणामी शेतकऱ्यांपूढे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतात. अशीच घटना धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावात घडली आहे.

बँकेचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून चिमठावळ (ता. शिंदखेडा) येथील दगडू शिवराम पवार (वय ४८) या शेतकऱ्याने मंगळवारी (ता. २२) पहाटे साडेपाचच्या सुमारास गावशिवारातील विहिरीत उडी घेत आत्महत्या (Suicide) केली. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू्ची नोंद करण्यात आली.

Farmer suicide
बारामती : 5300 कोटींच्या थकबाकीने महावितरणचे आर्थिक गणित बिघडले

याबाबत भालेराव महादू पाटील (पवार) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचा चुलत भाऊ दगडू पवार यांच्या नावावर चिमठावळ गावशिवारात चार बिघे शेती आहे. शेतीकामासाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेतलेले होते. त्यामुळे ते नेहमीच कर्जफेडीच्या विवंचनेत राहत होते. मंगळवारी घरी झोपलेले असताना बापू शिवराम पवार यांनी फोन करून त्यांना, दगडू पवार पहाटेपासून शौचालयासाठी गेले होते. ते अद्याप परत आले नसल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार त्यांच्या घरी व नंतर बापूसह शरद भास्कर पाटील, धनराज सखाराम पाटील, संजय राजधर पाटील, सुकलाल धुडकू अहिरे आदींसमवेत दगडू पवार यांचा गावात शोध घेतला.

Farmer suicide
डोंगरावरील शेतीतूनही घेतले विक्रमी उत्पन्न

त्या वेळी गावशिवारातील भिला रामदास निकम यांच्या विहिरीजवळ पहाटे सहाच्या सुमारास त्यांची चप्पल पडलेली दिसली. त्यामुळे संशय आल्याने विहिरीचे पाणी उपसले. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीबाहेर काडून खासगी वाहनाने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉ. विनय पवार यांनी दुपारी दीडला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार सदेसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com