Dhule News : शिरपुरमध्ये युवतीवर अत्याचार, युवकाला झाली अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule News

Dhule News : शिरपुरमध्ये युवतीवर अत्याचार, युवकाला झाली अटक

शिरपूर (जि.धुळे) : शहरातील बालाजीनगरमध्ये युवकाने १९ वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना १३ फेब्रुवारीला घडली. पीडित युवतीच्या फिर्यादीनंतर संशयिताला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. संशयित व पीडित एकमेकांचे नातलग आहेत.

पीडित युवतीच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या घरी आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी ती जात होती. तेथे तिचा नात्याने चुलत आतेभाऊ असलेला कमलेश सुनील जव्हेरी (वय २५, रा. वाल्मीकनगर, शिरपूर) हादेखील येत होता. (young man arrested for assaulting young woman in Shirpur Dhule News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

१३ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातला त्याने गहू उपसण्याच्या बहाण्याने तिला वरच्या मजल्यावर बोलावले. तेथे जिन्यामध्ये तिच्यावर अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास ठार करण्याची धमकी दिली. तिने ही बाब कुटुंबातील लोकांना सांगितली. त्यांनी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

त्यावरून संशयित कमलेश जव्हेरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तपास करीत आहेत.

टॅग्स :crimeCrime Against Girl