Dhule News : मासेमारीसाठी गेलेला युवकांचा वीज पडून मृत्यू

death
death esakal

Dhule News : मासेमारीसाठी गेलेला युवकांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. गणेश मोहन भोई (धनराळे, वय २८; रा. मालपूर ता. शिंदखेडा) असे मृत युवकाचे नाव आहे. (Youth went for fishing died due to lightning dhule news)

मालपूर (ता शिंदखेडा) येथील गणेश मोहन भोई (धनराळे) हा युवक नेहमीप्रमाणे हट्टी खुर्दे (ता. साक्री) येथील तलावात आज (ता.१८) सकाळी मासेमारीसाठी गेला होता. दहा ते बारा वाजेच्या दरम्यान विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू होता.

त्यावेळी मासेमारी करणारा गणेश भोई याच्या अंगावर वीज पडली अन्‌ पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती गणेशचा चुलतभाऊ सचिन दगडू धनराळे (रा. दुसाने ता. साक्री) यांना काकाच्या मुलाने फोनवरून कळविली. त्यानंतर लगेच हट्टी खुर्द गावाच्या धरणावर जाऊन घटनेची शहनिशा केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

death
Nashik News : 6 वर्षानंतर गोंदेगावला पूर्णवेळ तलाठी!

नातेवाइकांच्या मदतीने धरणाच्या पाण्यात बुडालेला गणेश यास बाहेर काढले. त्याच्या डोक्यावरील मागील बाजूचे व छातीवरील केस जळालेले होते. खांद्याची मागील बाजू पूर्णतः काळी पडली होती. गणेश तत्काळ जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. गावित यांनी तपासून मृत घोषित केले.

सचिन धनराळे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. सामाजिक- राजकीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य समितीचे सभापती महावीरसिंह रावल यांनी तत्काळ पंचनामा करण्यासाठी व शवविच्छेदनासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधला.

संतोषीमाता नगरातील मासेमारी करून खेडोपाडी विक्री करून उदरनिर्वाह करणारा गणेश भोई याचा दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यास दीड वर्षाचा मुलगा आहे. रात्री उशिरा मालपूर येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

death
Onion Crisis : कांदा आभाळातून पडलेला नाही! अनुदानासाठी सातबारावर नोंदीच्या अटींवर शेतकऱ्यांचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com