esakal | ZP Election - नंदुरबारमध्ये भाजपला दणका; काँग्रेसची सत्ता कायम
sakal

बोलून बातमी शोधा

नंदुरबारमध्ये भाजपला दणका; काँग्रेसची सत्ता कायम

सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेस व शिवसेनेचे सत्ता आहे. ती कायम राखण्यात या दोन्ही पक्षांना यश आले आहे.

नंदुरबारमध्ये भाजपला दणका; काँग्रेसची सत्ता कायम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या 11 गटांसाठी पोटनिवडणूक होती आज मतमोजणीनंतर जाहीर झालेला निकालात भाजपला तीन जागांचा फटका बसला आहे तर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा वाढली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील 11 गटांचे सदस्यांचे पद रद्द झाले होते त्यात नंदुरबार तालुक्यातील पाच, शहादा तालुक्यातील 4 तर अक्कलकुवा तालुक्यातील दोन गटांचा समावेश होता.

जिल्हा परिषदेत एकूण अकरा जागांमध्ये भाजपचे सात, शिवसेने चे दोन व काँग्रेसचे दोन जागांचे नुकसान झाले होते. मात्र पोटनिवडणुकीत आजचा निकालात भाजपला आपल्या सात जागा कायम ठेवण्यात अपयश आले आहे त्यांच्या तीन जागा घटले असून शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जास्तीची ताब्यात घेतले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य रद्द झाले नव्हते मात्र तरी त्यांनी निवडणुकीत भाग घेतल्याने त्यांना एक जागा अधिकची मिळाले आहे.

हेही वाचा: ZP Election 2021: पालघरमध्ये शिवसेनेला मोठा झटका, खासदाराच्या मुलाचा पराभव

ZP वर काँग्रेस- शिवसेनेची सत्ता कायम

सध्या जिल्हा परिषदेवर काँग्रेस व शिवसेनेचे सत्ता आहे. ती कायम राखण्यात या दोन्ही पक्षांना यश आले आहे. आता सध्या काँग्रेसच्या 24 व शिवसेनेच्या आठ असे एकूण 32 सदस्य झाले आहेत तर राष्ट्रवादीच्या त्यांनाच पाठिंबा राहणार आहे. भाजपच्या एकूण 23 जागा होत्या त्यात आता तीन जागा घटल्याने त्या वीस वर आल्या आहेत.

हेही वाचा: नागपूरात अनिल देशमुखांना धक्का; नगरखेड पंचायत समिती भाजपकडे

कही खुशी कही गम

माजी मंत्री विजयकुमार गावित व भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ते तथा खासदार हिना गावित यांनी निवडणुकीत पूर्ण ताकद लावली होती त्यात त्यांच्या कुटुंबातीलच दोन उमेदवार होते गटातून गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित विजयी झाल्या मात्र कोपरली गटात त्यांचे पुतणे पंकज गावित यांना पराभूत व्हावे लागले. त्यासोबतच त्यांच्या तीन जागा घटल्याने त्यांच्यासाठी कन्येच्या विजय होण्याच्या आनंद म्हणजेच खुशी असले तरी त्याचा पराभव व पक्षाच्या तीन जागा हातातून निसटले याने गम झाल्याचे चित्र आहे

loading image
go to top