मोकाट जनावरांमुळे भाजपची डोकेदुखी!

मुस्लिम समाजात ‘एमआयएम’चा फारसा प्रभाव नाही
BJP
BJPSakal

प्रयागराज: मुस्लिम समाजाची मतविभागणी करण्यात एमआयएमचे असोऊद्दीन ओवेसी यांचा फारसा प्रभाव नसतानाच मोकाट जनावरं अर्थात गुरढोरांच्या त्रासाने त्रस्त शेतकरी यामुळे भाजपची डोकेदुखी पाचव्या टप्प्यात वाढण्याचे संकेत आहेत. ओवेसीचा अन् गुरेढोरांच्या या दोन्ही मुद्द्यावर भाजप दुःखी तर समाजवादी कार्यकर्त्यांमधे खुशी असल्याचे जाणवते.

पाचव्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. यात प्रयागराज, अयोध्या, श्रावस्ती, अमेठी व बाराबंकी जिल्ह्याचा समावेश आहे. लखनौ शहर सोडल्यानंतर बाराबंकी ते प्रयागराज या भागात फिरताना जनावरांचा मुद्दा भाजपला जाचक ठरत असल्याचे दिसते. गहू, कांदा, पालेभाज्या अन राईची हिरवीगार फुललेली शेती दिसते. उत्तम शेतीचा हा प्रदेश आहे. त्यातच अयोध्या अन प्रयागराज या जिल्ह्यात हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी आहे. पण हिंदूंच्या सर्वच जातीत शेतकरी असल्याने गुरांचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतो.

BJP
मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?

हिरव्यागार फुललेल्या शेतीची चोवीस तास राखण करताना शेतकऱ्यांची अवस्था मात्र दयनीय असल्याचे चित्र आहे. अयोध्या ते सुलनापूर अन प्रतापगडकडे जात असताना मोकाट जनावरांचे थवेच्या थवे दिसतात. मोकाट जनावरं शेतात घुसू नये म्हणून दिवसा महिला तर रात्री पुरुष राखणीला राहतात. आजूबाजूच्या शेतात कोणी नसेल तर रस्त्यावरून जाणारी लोकं जनावरांना हाकलून लावतात. या मोकाट जनावरांच्या मुळे प्रचंड त्रास अन नुकसान झाल्याचे इंद्रप्रसाद मिश्रा हे गजराही गावचे शेतकरी सांगत होते. तर, डी.फार्मसी केलेला अनुराग पांडे हातात काठी घेऊन गव्हाच्या शेतात घुसलेला कळप हाकलताना दिसला. त्याला विचारले असता आज आमच्यावर शिक्षण घेऊनही ही मोकाट गुरांवर नजर ठेवण्याची वेळ आल्याचे हतबल होऊन सांगत होता. या परिसरातच नव्हे पण पश्चिम ‘यूपी’तही हेच चित्र आहे. सांडच्या भीतीने शेतकऱ्यांनाच एकत्र येऊन रात्र-रात्र बॅटरी घेऊन जागावे लागत आहे. उत्तरप्रदेशातील ग्रामीण भागात या मोकाट अर्थात जनावरांचा प्रश्नही निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, एमआयएमने टोकाचा प्रचार केला असला तरी मुस्लिम समाजात मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसत नाही. प्रयागराजवरून वाराणसी कडे जात असताना फुलपुर, प्रतापपुर हे मुस्लिमबहुल मतदार संघ आहेत. इथे ओवेसी हा फॅक्टरचं नसल्याचे लोक सांगत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com