
उत्तर प्रदेशात सपा, काँग्रेस, बसपने राजकारण केले. यांनी जात, पंथ, धर्म याचा आधार घेऊन राजकारण केले. हे पक्ष समाज आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळत आहेत.
सपा,बसपा सत्तेत आल्यावर दहशतवादासह गुन्हेगारीत वाढ- योगी आदित्यनाथ
सपा (SP) आणि बसपा (BSP) सत्तेत आल्यावर उत्तर प्रदेशात (UP) दहशतवादासह (Terrorist) गुन्हेगारी (Crime) वाढली. सपाच्या काळात राज्यात ७०० तर बसपाच्या काळात ३६४ दंगली झाल्या. पहिल्या सपा सरकारच्या काळात डझनभर दहशतवादी घटना घडल्या, ज्यात डझनभर लोक मरण पावले अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath) यांनी अमेठीतील (Amethi) तिलोई विधानसभा मतदारसंघात केली. आज त्यांनी अमेठीमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमावर जाहीर सभेला संबोधित केले.
योगींनी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. यावेळी समाजवादी पार्टीवर निशाणा साधताना योगी म्हणाले, सपाला मतदान करणे म्हणजे येणाऱ्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करणे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. समाजवादी पक्ष आपला अजेंडा घेऊन चालतो. उत्तर प्रदेशात सपा, काँग्रेस, बसपने राजकारण केले. यांनी जात, पंथ, धर्म याचा आधार घेऊन राजकारण केले. हे पक्ष समाज आणि राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा: Jayant Patil l अनेकांनी पक्ष सोडला तरीही राष्ट्रवादी उभा-जयंत पाटील
आपल्या सरकारचे कौतुक करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'आज तिलोईलाही वैद्यकीय महाविद्यालय मिळाले आहे. त्या वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही आम्ही केली आहे. समाजवादी पक्षही हे वैद्यकीय महाविद्यालय देऊ शकला, पण विकासाची दृष्टी त्यांच्याकडे नव्हती. हे मेडिकल कॉलेजही सपा सरकार देऊ शकले असते पण त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही. भाजप सरकार स्थापनेचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता. अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले. आम्ही गौमातेचे तुकडे होऊ देणार नाही. अन्नदाता शेतकऱ्यांचे पीकही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. निराधार गायीसाठी आम्ही गोठा बांधणार आहोत. सपा सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम दहशतवाद्यांचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Web Title: Cm Yogi Adityanath Criticism On Sp Bsp Up Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..