युवकांसाठी लढा देणार : पूजा शुक्ला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखविलेल्या आणि नंतर काही काळासाठी अटक झालेल्या पूजा शुक्ला या युवतीने राजकारणात उडी घेतली आहे.
Pooja Shukla
Pooja ShuklaSakal
Summary

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काळे झेंडे दाखविलेल्या आणि नंतर काही काळासाठी अटक झालेल्या पूजा शुक्ला या युवतीने राजकारणात उडी घेतली आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना काळे झेंडे दाखविलेल्या आणि नंतर काही काळासाठी अटक झालेल्या पूजा शुक्ला (Pooja Shukla) या युवतीने राजकारणात (Politics) उडी घेतली आहे. २५ वर्षीय पूजा शुक्ला यांना समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) उत्तर लखनौ मतदारसंघातून संधी दिली असून राज्यातील सर्वांत युवा उमेदवारांपैकी त्या एक आहेत.

जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ‘हिंदी स्वराज दिना’च्या कार्यक्रमासाठी लखनौ विद्यापीठ रस्त्यावरून जात असताना पूजा शुक्ला आणि इतर दहा जणांनी त्यांचा ताफा अडवून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांना काळे झेंडे दाखविले होते. मुख्यमंत्र्यांच्याविरोधात निदर्शने केली म्हणून २०१८ मध्ये लखनौ विद्यापीठाने त्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारल्यावर त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला माघार घेऊन त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रवेश देणे भाग पडले.

Pooja Shukla
'पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी Surgical Strike करून दहशतवाद्यांचा खात्मा केला'

वीस दिवस तुरुंगात काढल्यानंतर पूजा यांनी नंतर समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली. त्यानंतर त्या समाजवादी छात्र सभा या विद्यार्थी संघटनेच्या नेत्या बनल्या. मुलायमसिंह यादव यांनी केलेला संघर्ष आणि अखिलेश यादव यांच्या धोरणांमुळे प्रभावित झाल्याने समाजवादी पक्षाशी जोडले गेले, असे त्यांनी सांगितले. आता निवडणूक लढवून मी युवकांचे प्रश्‍न प्राधान्याने मांडणार आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले. चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारीला उत्तर लखनौमध्ये मतदान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com