UP Election: 292 जागांसाठी झालं मतदान; असे दिसून येतायत कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shriram pawar's uttar pradesh election article in saptarang

UP Election: 292 जागांसाठी झालं मतदान; असे दिसून येतायत कल

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळपास 70 टक्के पार पडली आहे. 403 पैकी 292 मतदारसंघातील मतदारांनी आधीच मतदान केले आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील १११ जागांसाठी मतदान बाकी असून निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक आहेत. मागील निवडणुकीवर (Uttar Pradesh) भाजपचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येत होता. मात्र, तशी परिस्थिती सध्या नाहीये. या टप्प्यावर ही निवडणूक कोणत्या मार्गावर आहे? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. (Uttar Pradesh Assembly elections 2022)

1. सपा प्रमुख विरोधक

राष्ट्रीय लोक दल, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, महान दल, प्रगतीशील समाज पक्ष (लोहिया) आणि जनवादी पक्ष (समाजवादी) हे समाजवादी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. या निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपाने प्रमुख विरोधी पक्षाची जागा काबीज करत भाजपच्या सत्तेला आव्हान दिलं आहे. बेरोजगारी, शेतकरी, लघुउद्योग आणि सरकारी कर्मचारी अशा लोकांच्या आर्थिक संकटांवर सपाने लक्ष दिलं आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे यादव-मुस्लीम या समीकरणापलिकडे जाऊन ओबीसी आणि दलितांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही रणनीती कितपत यशस्वी ठरते हे पाहणं निर्णायक ठरेल.

2. पहिले दोन टप्पे भाजपसाठी वाईट

पहिल्या आणि दुस-या टप्प्यामध्ये सपाच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपचे मोठे नुकसान केलंय. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाट मतांमुळे भाजपचे पहिल्या टप्प्यात नुकसान झालंय तर दुसऱ्या टप्प्यात सपाच्या मागे मुस्लीम मतांमुळे झालंय. अंदाजानुसार, या दोन्ही टप्प्यांत मिळून भाजपला 30 जागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे तर काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की याहून अधिक होऊ शकते.

3. तिसऱ्या ते पाचव्या टप्प्यात भाजपचं कमबॅक

मैनपुरी, इटावा आणि कन्नौज यांसारखे यादवबहुल जिल्हे वगळता उच्च जातीची लोकसंख्या असलेल्या मतदारसंघामध्ये 3-5 टप्प्यात मतदान झालंय, ज्याचा भागात भाजपला फायदा झालेला असू शकतो. बुंदेलखंडमध्ये भाजपला मतांच्या प्रमाणात तोटा होताना दिसत आहे. मात्र, तरीही या तीन टप्प्यांमध्ये भाजपला सपापेक्षा मोठी आघाडी मिळू शकते. असं असूनही 2017 च्या तुलनेत त्यांचे लक्षणीय नुकसान होऊ शकते.

4. मोदी फॅक्टर अजूनही लोकप्रिय

या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा कितीही कमी झाला असला तरी मतदारांमध्ये अजूनही मोदींबद्दल आशा आहे. ग्राउंड रिपोर्ट्समधून दिसून येतं की मोदींची लोकप्रियता अद्याप टिकून आहे. कोरोना काळात मजूरांचे झालेले हाल आणि बेरोजगारी असतानाही ते पंतप्रधानांना दोष देताना दिसत नाहीयेत. दुसरीकडे, युक्रेन-रशिया युद्धाचा भाजपला फायदाच होण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र, आमदारांबाबत मतदारांमध्ये राग असल्याचं दिसून येतं. राम मंदिराचं बांधकाम सुरु असलेल्या अयोध्या मतदारसंघातही भाजप आमदाराविरोधा नाराजी आहे. स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि इतर अनेक आमदारांच्या बाहेर पडण्याचा फटका भाजपला बसू शकतो. योगी आदित्यनाथ यांचीही लोकप्रियता कमी झालेली असली तरी थोडीफार अबाधित आहे.

5. बसपा गायब असली तरी जलवा कायम

साधारण जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत, बसपा आपल्या पूर्ण क्षमतेने प्रचार करत नसल्यासारखे दिसत होते आणि अनेकांनी पक्ष सोडला होता. यामुळे सपाला राज्यात मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्यास मदत झाली.

जानेवारी महिना उजाडला तरी बहुजन समाज पक्ष प्रचाराच्या रणधुमाळीत कुठेच दिसून येत नव्हता. बसपाच्या अनेकांनी पक्ष सोडल्यामुळेही त्याचा फायदा सपाला विरोधी पक्ष म्हणून स्वत:ला सादर करण्यात झाला. असं असलं तरी पक्षाने पूर्णपणे जनाधार गमावलेला नाहीये. बसपा हा जाटव बेसवर अवलंबून आहे. मात्र, यावेळी त्याचा किती फायदा पक्षाला होईल, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

6. काँग्रेसचे भवितव्य उमेदवारांवर अवलंबून

काँग्रेसने या निवडणुकीमध्ये जोर लावला आहे. 'लडकी हूँ लड सकती हूँ' यासारख्या घोषणांची बरीच चर्चा झाली. तसेच पक्षाने 40 टक्के तिकीटे महिलांना वाटल्याचीही चांगली चर्चा झाली. प्रियांका गांधींच्या प्रचारसभांना चांगली गर्दी झालेली दिसून आली आहे. या निवडणुकीचा आणखी एक पैलू आहे की, मोठ्या शहरांमधील अनेक उच्च जातीच्या मतदारांसाठी, सपा नव्हे तर भाजपसाठी काँग्रेस हा पसंतीचा पर्याय ठरतो आहे.