नानासाहेब धर्माधिकारी यांना अभिवादन अन् फोटो आप्पासाहेबांचा; पाटलांचं ट्विट चर्चेत

Chandrakant patil Tweet on Nanasaheb Dharmadhikari
Chandrakant patil Tweet on Nanasaheb Dharmadhikarie sakal

मुंबई : निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी (NanaSaheb Dharmadhikari) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) नानासाहेबांना अभिवादन केले. त्यांनी ट्विटर पोस्ट टाकली. पण, त्यात फोटो चुकीचा वापरला. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याऐवजी त्यांचे सुपूत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा फोटो वापरला.

Chandrakant patil Tweet on Nanasaheb Dharmadhikari
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने देशभरात स्वच्छता अभियान

''थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती आहे. अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती अशा विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थ भावनेने त्यांनी समाजकार्य केले. त्यांचे प्रेरणादायी विचार आम्हाला सदैव मार्गदर्शन करत राहतील'', असं ट्विट चंद्रकांत पाटलांनी केलंय. पण, फोटो चुकीचा वापरला. त्यामुळे काही सजग वाचकांनी त्यांच्या ट्विटला उत्तर देत फोटो चुकल्याचं लक्षात आणून दिलंय. एकाने म्हटलंय, की हा फोटो नानासाहेब धर्माधिकारी यांचा नाहीतर आप्पासाहेब धर्माधिकारी आहे. फोटो तर नीट वापरा, असा सल्ला देखील युजर्सने चंद्रकांत पाटलांना दिला आहे. पाटलांनी जवळपास १ तासानंतर हे ट्विट डिलिट केलंय.

चंद्रकांत पाटलांनी केलेलं ट्विट
चंद्रकांत पाटलांनी केलेलं ट्विटe sakal

कोण आहेत नानासाहेब धर्माधिकारी? -

नानासाहेब धर्माधिकारी यांचं पूर्ण नाव नारायण विष्णू धर्माधिकारी आहे. त्यांचा जन्म १ मार्चे १९२२ रोजी झाला. ते निरुपपणकार होते. गुजराती महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००) जिल्हापरिषदेतर्फे रायगडमित्र(१३ मे १९९३) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com