जातीयवाद, घराणेशाहीच्या राजकारणाला जनतेची तिलांजली - योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशात दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साधला जनतेशी संवाद
Yogi Adityanath
Yogi Adityanath

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा (UP Election) निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेही आभार मानले आहेत. तसेच जातीयवाद, घराणेशाही आणि वंशवादाच्या राजकारणाला पूर्णपणे तिलांजली देत जनतेनं भाजपला प्रचंड बहुमतानं विजय मिळवून दिला आहे, असं ते म्हणाले. (Yogi Adityanath first reaction after resounding victory in UP)

Yogi Adityanath
Election Results : पाच राज्यांचे निकाल : काँग्रेसशिवाय यापुढे देशाचे राजकारण

योगी म्हणाले, "उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपचा मोठा विजय झाला असून बहुमताचे सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान मोदींच्या विकास आणि सुशासनाला पुन्हा एकदा जनतेनं त्यांचे मत दिले आहे. यानिमित्त सर्वात आधी पंतप्रधान नरेदं्र मोदीं, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि आमच्या सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो. केंद्रीय नेतृत्वात भाजप प्रचंड बहुमताने चार राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरले आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. उत्तर प्रदेशवर देशासह जगाचे लक्ष होते. आज भाजप आणि भाजपचे सहकारी पक्ष उत्तर प्रदेशात मोदींच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात पुन्हा बहुमत मिळवलं आहे. या बहुमतासाठी उत्तरप्रदेशातील जनतेचे आभार. भाजपच्यावतीने भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या कष्टामुळे आज भाजपला इतकं प्रचंड बहुमत मिळालं असून सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. पहिल्यांदा सात टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुका झाल्या. या शांततेत पार पडल्या. निवडणूक आयोगानं शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली तसंच निवडणुकीशी संबंधीत प्रशासकीय कर्मचारी आणि कोरोनाच्या काळातही शांततेनं लोकशाहीचा हा उत्सव पार पाडण्यात बहुमुल्य असं योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार"

Yogi Adityanath
Election Results : पाच राज्यांचे निकाल : काँग्रेसशिवाय यापुढे देशाचे राजकारण

पाच वर्षात आम्ही राज्यात सातत्यानं सुरक्षित वातावरण निर्माण केलं. उत्तर प्रदेशच्या आस्थेला सन्मान दिला. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांना मजबुतीनं पुढे नेण्याचं काम केलं. यासाठी जे प्रयत्न सुरु झाले आहेत त्याचा परिणाम आज दिसून आला. यासाठी जातीयवाद, घराणेशाही आणि वंशवादाच्या राजकारणाला पूर्णपणे तिलांजली देत जनतेनं भाजपला प्रचंड बहुमतानं विजय मिळवून दिला आहे. कोरोनाच्या काळातही न थांबता, न थकता, न झुकता पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा विजय खेचून आणला आहे, असं मुख्यमंत्री योगी यावेळी म्हणाले.

जेव्हा आपण कोरोनाशी लढत होतो तेव्हा हे सर्व षडयंत्रकारी लोक भाजप सरकारविरोधात कारस्थानं करत होते. आज आपल्या जनादेशातून जनतेनं या सर्वांना पुन्हा एकदा धडा शिकवून त्यांची बोलती बंद केली आहे, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com