स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी १ कोटी ९० लाख, मेडिकलच्या तिजोरीवर पडणार भार

1 crore 90 lakh rupees for structural audit for government medical college nagpur
1 crore 90 lakh rupees for structural audit for government medical college nagpur

नागपूर : भंडाऱ्यातील आगीच्या घटनेनंतर मेडिकलमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पुन्हा एकदा १ कोटी ९० लाख ५४ हजार रुपयाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. दरवर्षी, दीड कोटीचा भार मेडिकलच्या तिजोरीवर पडत असल्याची बाब पुढे आली आहे. 

मेडिकलच्या अखत्यारीतील सर्वच इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची सूचना देत दीड कोटींचा प्रस्ताव दिल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत मेडिकल प्रशासनाने तत्काळ हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे सादर केला आहे, तो प्रस्ताव तत्काळ मंजूर झाला होता. त्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. मात्र, वर्षभरानंतर पुन्हा १ कोटी ९० लाख ५४ हजारांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मेडिकल, टीबी वॉर्डसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्वच इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तसेच डागडुजी करण्यापासून तर या बांधकामांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा एक भाग आहे. दरवर्षी, नियमितपणे हे ऑडिट करण्यात येते. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर या विभागाला जाग येते. वेळेवर इमारतींच्या बांधकामांचे ऑडिट झाले तर अशा दुर्दैवी घटना टाळता येतात. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा वैद्यकीय वर्तुळात आहे. 

पोर्च पडल्याच्या घटनेचे काय झाले? - 
मेडिकलच्या चर्मरोग विभागातील घटनेनंतर तत्काळ येथील इमारतीचे व्हीएनआयटीच्या पथकाकडून स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. बांधकाम विभागाला चर्मरोग विभागातील पोर्च कोसळल्याच्या घटनेचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. त्या अहवालानंतर मेडिकलमधील प्रवेशद्वार स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली विद्रूप करण्यात आले आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com