मेडिकलचे वसतिगृह ‘हॉटस्पॉट’; एमबीबीएसच्या १० विद्यार्थ्यांना कोरोना, विषाणूने पुन्हा डोकं वर काढले

10 MBBS students coronavirus positive Nagpur corona news
10 MBBS students coronavirus positive Nagpur corona news

नागपूर : अचानक दहा ते बारा दिवसांपासून सातत्याने बाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता कोरोनाच्या विषाणूने पुन्हा डोकं वर काढल्याचे दिसते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नुकतेच प्रवेश झाल्यानंतर एमबीबीएसच्या पदवीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या दहा विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे मेडिकलमध्ये खळबळ उडाली आहे. दहा विद्यार्थ्यांसह जिल्ह्यात ४९८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

मेडिकलमध्ये एमबीबीएसचे वर्ग सुरू होऊन पंधरा दिवस लोटले. यात एक मुंबईचा मुलगा आहे. त्या मुलांच्या संपर्कात आल्याने इतर मुलांनाही कोरोना झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, एकाचवेळी मेडिकलमधील दहा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले.

यामुळे येथील पेइंग वॉर्ड हाऊसफुल्ल झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी वॉर्ड क्रमांक १३ मध्ये स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना सध्या लक्षणे नाहीत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना वेगळे ठेवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार सोमवारी केवळ २ हजार ६३५ कोरोना चाचण्या झाल्या असून यातील ४९८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे अचानक कोरोनावर मात करण्याच्या टक्केवारीत घट झाली. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या १ लाख ३९ हजार २५३ वर पोहचली आहे.

यात शहरातील १ लाख १० हजार ९४ रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागातील २७ हजार ४०९ रुग्ण आहेत. तर ९१० रुग्ण हे जिल्ह्याबाहेरचे आहेत. २८१ जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. यामुळे कोरोनाच्या बाधेवर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ३० हजार ७५९ झाली आहे. एकूण ४२३३ कोरोनाबाधित मृत्यूची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

गृहविलगीकरणात २९४१ रुग्ण

आठ दिवसांपूर्वी गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या २ हजारावर आली होती. मात्र अचानक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली. सोमवारी गृहविलगीकरणात २ हजार ९४१ रुग्ण आहेत. ते स्वतः आपल्या परीने उपचार घेत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही साडेसहाशेवर आली होती. ती एक एक हजारावर पोहचली आहे. यामुळे प्रशासनाने नियंत्रणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com