अरे बापरे ! नागपूर जिल्हयातील "या' तालुक्‍यात निघाले एकाच दिवशी 15"पॉझिटिव्ह'....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

ग्रामीण भागात आता कोरोना हातपाय पसरवित आहे. नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्‍यात आतापर्यंत 43 रूग्णसंख्या झाली असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रसारावर प्रशासन कितीही आवर घालण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर मर्यादा पडत आहेत.

कामठी (जि.नागपूर) : कोरोनाबधित रुग्णांच्या कुटुंबातील दहा सदस्यांपैकी नऊ सदस्य हे कोरोनाबाधित आढळले. तसेच त्याच्या संपर्कात आलेले दोन कर्मचारी तसेच नया बाजार परिसरातील एक इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर जुनी कामठी पोलिस ठाण्याजवळील लक्ष्मी टॉवर रहिवासी 69 वर्षीय इसम कोरोनाबाधित आढळला. भिलगाव रहिवासी एक महिला पोलिस कर्मचारी व विद्युत विहार कोराडी येथील हैदराबाद येथून आलेली मुलगी कोरोनाबाधित आढळली. यानुसार, आज एकाच दिवशी शहरात 13 व ग्रामीण भागातील दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यानुसार, कामठी तालुक्‍यातील कोरोनाबाधित ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 20 झाली असून, यामध्ये शहरात 14 तर ग्रामीण भागातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

अधिक वाचा : बापरे !चोरांच्या टोळीत चक्‍क पोलिस हवालदार, असा झाला भंडाफोड...

कोळसाटाल परिसर ठरतो "हॉटस्पॉट'
प्राप्त माहितीनुसार, कामठी तालुक्‍यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा 12 एप्रिल रोजी लुंबिनीनगर येथे आढळला होता. अशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तालुक्‍यात आजपावेतो 43 झाली होती. यातील 23 रुग्ण हे उपचार घेऊन "निगेटिव्ह' झाले आहेत. यातील 20 रुग्ण हे अद्याप ऍक्‍टिव आहेत. यामध्ये शहरात 13 तर ग्रामीणच्या सहा रुग्णामध्ये परसाड, नांदा, कोराडी, बिडगाव, भिलगाव, महादुला येथील रुग्णांचा समावेश आहे.

अधिक वाचा : नागपूर जिल्हयातील आता "हे' तालुके हादरले, नागरिकांत प्रचंड भीती...

25 संशयीतांना क्‍वारंटाईन
काल कामठीच्या कोळसाटालमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची नोंद होताच, तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता. मात्र, आज एकाच दिवशी शहरात 15 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने शहरातील वारीसपुरा, बुनकर कॉलनी, नया बाजार परिसर, जुनी कामठी पोलिस स्टेशनच्या जवळील लक्ष्मी टॉवर परिसर प्रतिबंधित करून या कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीयांसह जवळपास 25 संशयितांना वारेगावच्या कोविड सेंटरमध्ये क्‍वारंटाइन करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तसेच कोरोनाबाधित आढळलेल्या या सर्व रुग्णांना शासकीय विलगीकरण कक्षात उपचारार्थ हलविण्यात आले.

हेही वाचा : एक दिवस भरलेली शाळा दुस-या दिवशी बंद, ही काय नवी भानगड..

तहसीलदारांचे आवाहन
तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, गळ्यात खवखव असे कोरोनाची संशयित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी मनात कुठलाही नकारात्मक विचार न आणता आपल्या घरी दररोज सर्वेक्षण करायला येत असलेल्या सर्वेअर, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांना प्रत्यक्ष माहिती देऊन स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी. स्वतःची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

केंद्रीय कारागृहात दवलामेटीतील महिला संक्रमित
दवलामेटी : कोरोनाचा प्रसार व प्रभाव आता नागपूर व बाहेरील संपर्क आल्याने ग्रामीण क्षेत्रात पण हळूहळू प्रसारित होत आहे. दवलामेटीच्या हिल टॉपमध्ये एक महिला कोरोनाबाधित असल्याचे जाहीर होताच परिसर, आरोग्य विभाग, ग्रा. पं. प्रशासन यांच्यात चिंता निर्माण होणे स्वाभाविक आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाधित 28 वर्षीय महिला हिल टॉप येथे कुटुंबासोबत राहते. ती नागपूरच्या केंद्रीय कारागृहामध्ये कार्यरत आहे. इथून ती कर्तव्यावर जायची, अशी माहिती आहे. नागपूरच्या सेंट्रल जेल येथे मोठ्या संख्येने कर्मचारी कोरोनाबाधित मिळाले. त्यामुळे तेथील प्रशासन व पोलिस विभागात खळबळ उडाली. जेल प्रशासनाने अन्य कर्मचाऱ्यांसोबत या दवलामेटी निवासी महिला कर्मचाऱ्यांचीही नुकतीच तपासणी केली व तिला क्‍वारंटाइन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 'positives' on the same day in 'Ya' taluka of Nagpur district.