esakal | नागपुरात चार ड्रग्स तस्करांना अटक; १ लाख ३७ हजारांची एमडी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

4 drug dealers caught by Nagpur police

दिवाळीच्या सणादरम्यान ड्रग्स तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला दिवाळीच्या पाडव्याला पाचपावली हद्दीतील कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपाच्याजवळ तीन ड्रग्स तस्कर एमडी पावडर घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. 

नागपुरात चार ड्रग्स तस्करांना अटक; १ लाख ३७ हजारांची एमडी जप्त

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपासमोर मॅफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीस घेऊन येणाऱ्या चार ड्रग्स तस्करांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. तस्करांकडून १ लाख ३७ हजार ३२० रुपयांची ३४ ग्रॅम ३३ मिली एमडी पावडर जप्त केली. 

दिवाळीच्या सणादरम्यान ड्रग्स तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला दिवाळीच्या पाडव्याला पाचपावली हद्दीतील कामठी रोडवरील भारत पेट्रोलपंपाच्याजवळ तीन ड्रग्स तस्कर एमडी पावडर घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. 

सविस्तर वाचा - बापरे! धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्याला सापडले सोने; लक्ष्मीपूजनाला तीन गावात दवंडी देऊन केले परत

पथकाने दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून आरोपी मोहम्मद इश्तियाक मोहम्मद अशपाक अंसारी (वय २७, रा. हसनबाग, नंदनवन), सोहेल पटेल मजहर पटेल (वय २२, रा. टेकानाका, नागपूर), मोहम्मद कफीक मोहम्मद अयुब (वय २४, रा. चांदणी चौक, हसनबाग, नागपूर) आणि मोहम्मद दानिश खालीद अंसारी (वय २६, रा. नायगाव नगर, पाडा, मुंबई) याला अटक केली. 

पोलिसांनी त्यांच्या जवळून १ लाख ३७ हजार ३२० रुपयांचे ३४ ग्रॅम ३३ मिली एमडी पावडर, २० हजारांचे ४ मोबाईल, १ लाख ८५ हजारांच्या तीन दुचाकी असा एकूण ३ लाख ४२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चारही आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या पथकाने केली.

संपादन - अथर्व महांकाळ