सावर रे ! नागपूर जिल्ह्यात 6 नवे रुग्ण, चिंता वाढली...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

काटोल तालुक्‍यातील रिधोरा, वाडी, अमरनगरला प्रथमच रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच वाडी परिसरात सामाजिक अंतराचे पालन न होणे, अनेकांकडून मास्क न लावण्यासह इतरही बऱ्याच स्थानिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे वेळीच वाडीला काळजी न घेतल्यास येथेही मोठा धोका संभावत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
 

नागपूर (ग्रामीण) : नवीन बाधितांमध्ये काटोल तालुक्‍यातील रिधोरा येथील 1, वाडी परिसरातील 3,
नीलडोहच्या अमरनगर येथील एक, कोराडी येथील एक अशा एकूण सहा जणांचा समावेश आहे. काटोल तालुक्‍यातील रिधोरा, वाडी, अमरनगरला प्रथमच रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यातच वाडी परिसरात सामाजिक अंतराचे पालन न होणे, अनेकांकडून मास्क न लावण्यासह इतरही बऱ्याच स्थानिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे वेळीच वाडीला काळजी न घेतल्यास येथेही मोठा धोका संभावत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : दगडी चाळीतून खासगी गाडीने नागपूरकडे निघाला "डॅडी', मात्र शहरात पोहोचताच...

अमरनगरमध्ये एक कामगार "पॉझिटिव्ह'
हिंगणा एमआयडीसी : चोरट्या पावलांनी एमआयडीसी अमरनगरात कोरोना शिरला. लोकमान्यनगरातून सुरुवात करीत इसासनी ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगरनंतर पारधीनगर आणि आता अमनगरात प्रवेश केल्याने कंपनी मालक व कामगारांत चिंता पसरली आहे. नीलडोह ग्रामपंचायत परिसरातील अमरनगर येथील एक कामगार पॉझिटिव्ह आल्याने अमरनगर येथील नागरिकांत चिंतेची बाब पसरली आहे. इसासनी येथील कोरोना पॉझिटिव्ह आणि अमरनगर येथील एक कामगार दोघेही एकाच कंपनीत काम करीत होते. संपर्कात आलेल्या एकूण 14 जणांना क्वांरटाइन करण्यात आले. त्यात दवाखान्यात नेणारा ऑटोचालक, दोन सहकारी कामगार, नातेवाईक, शेजारी यांचा यात समावेश असून, परिसरात सॅनिटरची फवारणी व इतरही उपाययोजना ग्रामविकास अधिकारी गुणवंत चिमोटे यांनी परिसराची पाहणी करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहे.
तहसीलदार संतोष खांडरे, खंडविकास अधिकारी महेद जुवारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. शेलकर, पोलिस निरीक्षक एमआयडीसीचे हेमंत खराबे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

आणखी वाचा : ब्यूटी पॉर्लर बंद आहेत !घरीच वाढवा सौंदर्य

दहा बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात
कामठी :  तालुक्‍यातील महादुला नगरपंचायतीत बिहार राज्यातून 22 मे रोजी आलेल्या 35 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे 29 मेला आलेल्या अहवालात निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या नांदा पुनर्वसन येथील 24 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे गुरुवारी (ता. 11) निष्पन्न झाले. पॉझिटिव्ह अहवाल आलेला हा कोराडी पॉवर हाउस येथे
कामाला होता. सध्या हा रुग्ण गेल्या 12 दिवसांपासून क्‍वारंटाइन होता. त्याचा सुरुवातीचा पहिला
अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु, आज दुसरा स्वॅब तपासणी अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला असल्याने या रुग्णाच्या संपर्कात आणखी किती व्यक्ती आले, याचा शोध घेणे स्थानिक प्रशासनाने सुरू केले आहे. बाधित रुग्णांपैकी हा अकरावा रुग्ण असला तरी आतापर्यंतच्या दहा बाधित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा : काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे
 
रिधोरा येथील तरुणाची प्रकृती अस्वस्थ
काटोल : तालुका कोरोनामुक्त झाल्यानंतर गुरुवारी तालुक्‍यातील रिधोरा येथील तरुण पॉझिटिव्ह निघाल्याची वार्ता परिसरात पसरताच त्याच्या संपर्कात आलेल्यांनी धास्ती घेतली आहे. अनेक स्वतः तपासणी म्हणून दखल घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार, तरुणाची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे काटोल खासगी हॉस्पिटलमध्ये 3 दिवस उपचार केल्यानंतर नागपूरला बुधवारी उपचाराकरिता घेतलेल्या चाचणीत आज तो पॉझिटिव्ह आला आहे. तालुका प्रशासनाला माहिती कळताच उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, डीवायएसपी नागेश जाधव, यांनी रिधोरा येथे भेट दिली. हनुमान मंदिर परिसर सील केला. या भागातील जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी त्वरित भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 new patients in Nagpur district, anxiety increased