उपराजधानीत एकाच दिवशी ७५ परिसर प्रतिबंधित

राजेश प्रायकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

गांधीबाग झोनमधील जामदार गल्ली, गाडीखाना, नाईक रोड, महाल, राहतेकरवाडी दसरा रोड, बापूराव गल्ली इतवारी, संघ बिल्डिंग परिसरात प्रतिबंध लावण्यात आले.

नागपूर : शहरात १२२ कोरोनाबाधित आढळून आले असून त्यांच्या निवासी परिसरात निर्बंध घालण्यात आले. शहरात आज प्रथमच एकाच दिवशी ७५ परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यात नेहरूनगर व मंगळवारी झोनमधील सर्वाधिक प्रत्येकी १७ वस्त्यांचा समावेश आहे. 

सध्या ती काय करते? 'स्वदेश' फेम गायत्री जोशीची कहाणी, वाचा...

महापालिकेने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग २६ मधील चैतन्येश्वरनगर, सरस्वतीनगर, वैष्णोदेवीनगर, विद्यानगर प्रभाग २८ मधील चिटणीसनगर, रामकृष्णनगर उमरेड रोड, अंबानगर दिघोरी येथील खुरपुडे लॉन परिसर, स्मृतीनगरात संत किराणाजवळ, योगेश्वरनगर, गाडगेनगर हनुमान मंदिराजवळ प्रभाग २७ मधील ओमनगर, श्रीनगर गल्ली क्रमांक २, नंदनवन झोपडपट्‍टी क्रमांक एक, प्रभाग ३० मधील छोटा ताजबागेतील प्रीती अपार्टमेंट, ठाकूर प्लॉट मोठा ताजबाग, औलियानगरातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. 

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

मंगळवारी झोनमधील झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा बसस्टॉप, जरीपटका, सुशीलानगर, मोहननगर, बोरगाव, कोराडी रोड, जाफरनगर, महेशनगर, दत्तनगर, मानकापूर, पंजाबी लाईन रेल्वे क्वार्टर परिसरातही निर्बंध लावण्यात आले. आशीनगर झोनमध्ये बुद्धनगर क्रमांक २, पंचशीलनगर, सुजातानगर, राजगृहनगर, लष्करीबाग, गुरुनानकपुरा, कुकरेजा सन सिटी नारी रोड, गांधीबाग झोनमधील जामदार गल्ली, गाडीखाना, नाईक रोड, महाल, राहतेकरवाडी दसरा रोड, बापूराव गल्ली इतवारी, संघ बिल्डिंग परिसरात प्रतिबंध लावण्यात आले.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

लक्ष्मीनगर झोनमध्ये संत गाडगेनगराजवळील म्हाडा कॉलनी, मंगलधाम सोसायटी, बाभडे ले-आऊट, एरिगेशन कॉलनी चुना भट्‍टी रोड, तात्या टोपेनगरातील अमेय अपार्टमेंट, जयताळा रोडवरील आझाद हिंदनगर, जयप्रकाशनगर, धरमपेठ झोनमधील झेंडा चौकातील गणेश भवन, शिवाजीनगरातील मालती मेंशन. 

(संपादन : प्रशांत राॅय)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 75 premises restricted in one day