थायलंडमध्ये साकारतेय तब्बल ८४ फुटांची बुद्धमूर्ती ; नागपुरातील ‘सिहोरा’ येथे २०२१ मध्ये उद्घाटन

केवल जीवनतारे 
Sunday, 25 October 2020

बुद्धाच्या सम्यक तत्त्वज्ञानाची तर बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांना फुलवणारी क्रांतिशाळा नागपुरात जागोजागी उभारली जावी हा यामागचा उद्देश असल्याचे सिहोरा येथे अहिल्याबाई होळकर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीतर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘बुद्धा स्पिरिच्युअल पार्क’ चे संचालक नितीन गजभिये म्हणाले. 

नागपूर : भारतीय बौद्धांच्या परिवर्तनाचे स्रोत असलेल्या दीक्षाभूमीच्या शहरात आता आणखी एका बौद्ध स्थळाची भर पडणार आहे. सिहोरा येथे ८४ फुट बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात येण्यात आहे. विशेष असे की, या बुद्धमूर्ती उभारण्याचे काम थायलंड येथे सुरू झाले आहे. २०२१ च्या बुद्ध जयंती पर्वावर नागपुरात स्थापित करण्यात येईल.

बुद्धाच्या सम्यक तत्त्वज्ञानाची तर बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांना फुलवणारी क्रांतिशाळा नागपुरात जागोजागी उभारली जावी हा यामागचा उद्देश असल्याचे सिहोरा येथे अहिल्याबाई होळकर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीतर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘बुद्धा स्पिरिच्युअल पार्क’ चे संचालक नितीन गजभिये म्हणाले. 

जाणून घ्या - सर्तक रहा, आणखी पाऊस येणार म्हणजे येणार!

या पार्कमध्ये ही ८४ फूट उंच बुद्ध मूर्ती स्थापण्यात येणार आहे. म्यानमार येथील बौद्ध उपासक फादर टॅन गॅर युथान यांच्या मदतीतून ही बुद्ध मूर्ती तयार होत आहे. फादर टॅन हे म्यानमारमधील प्रसिद्ध उद्योजक असून मोठे बौद्ध उपासक व समाजसेवी आहेत. येत्या ७ ऑक्टोबर रोजी या बुद्ध मूर्ती फाउंडेशनचे भूमिपूजन भंते अनेक व फादर टॅन गॅर युथान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

बुद्ध मूर्ती उभारण्यास तब्बल दोन वर्षे लागले आहे. २०२१ मध्ये ही बुद्ध मूर्ती नागपुरात स्थापण्यात येणार आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरातील बौद्ध भंते व प्रतिनिधींच्या उपस्थितीत या बुद्ध मूर्तीचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असे गजभिये म्हणाले.

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

थायलंड येथे उभारण्यात येणाऱ्या बुद्ध मूर्तीला ‘शाक्य ऑफ नागपूर’ हे नाव देण्यात आले आहे. बुद्ध मूर्ती तयार होत आहे. ८० टक्के काम झाले आहे. ही मूर्ती स्थापन करण्यात आल्यानंतर ‘बुद्धा स्पिरिच्युअल पार्क’ ही तथागत बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसाराचे केंद्र बनेल, हे निश्चित.
-नितीन गजभिये, 
संचालक, अहिल्याबाई होळकर मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 84 feet Budhha statue making in Thailand