राष्ट्रवादीचा वादग्रस्त नेता साहीलचे अनेक राजकीय पुढारी व मंत्र्यांशी संबंध, फोटो व व्हिडिओ दाखवून करायचा फसवणूक, आता...

ACB to probe Sahil Syed's audio clip
ACB to probe Sahil Syed's audio clip

नागपूर : साहील सय्यदचे शहरातील अनेक राजकीय पुढारी व मंत्र्यांशी संबंध असल्याचे बोलले जात आहेत. भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आजी व माजी मंत्र्यांसोबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो दाखवूनच साहील हा अनेकांची फसवणूक करीत होता, असे बोलले जाते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी साहील सय्यदविरुद्ध मानकापूर पोलिस ठाण्यात ऍलेक्‍सिस रुग्णालयाच्या डॉक्‍टरला धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो चर्चेत आहे. त्याने गिरीश गिरधर याच्यासह मिळून एका वृद्ध महिलेचे घर बळकावले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध रविवारी पाचपावली पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला.

साहील सय्यदची एक ध्वनीफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली. यात तो न्यायाधीशांच्या मदतीने डॉ. प्रवीण गंटावार यांना अटकपूर्व जामीन मिळवून दिल्याचा दावा केला. त्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना आपण रोखून धरले होते, असा उल्लेख आहे. या ध्वनीफितीची एसीबीच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी गांभीर्याने दखल घेऊन डॉ. गंटावार प्रकरणाशी साहील सय्यदचा काय सहभाग आहे, हे तपासण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर यांना दिले. 

दुसरीकडे महापौर संदीप जोशी आणि भाजपचे जेष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा उल्लेख असल्याने दयाशंकर तिवारी यांनी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. लवकरच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली.

एसीबी करणार क्‍लिपचा तपास

राष्ट्रवादीचा कथित वादग्रस्त नेता साहील सय्यद याच्या आवाजातील "ऑडिओ क्‍लिप' लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही (एसीबी) गांभीर्याने घेतली आहे. ऑडीओ क्‍लीपमधील संभाषण डॉ. प्रवीण गंटावार आणि डॉ. शीलू गंटावार यांच्याशी कोणत्या प्रकारे संबंधित आहे, हे तपासण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com