दोघांचा अपघाती मृत्यू; खुमारीवासींचे "रस्ताजाम' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

पोलिस प्रशासन कुठेतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास खुमारीवासींनी महामार्गावर चक्का जाम केले. 

मनसर (जि.नागपूर) :  नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.7 वरील मरारवाडी गावाजवळ अवैध वाहतुकीवर कारवाई करीत असताना रविवारी झालेल्या विचित्र अपघातात पोलिस शिपाई रितेश देवराव भोपरे (वय 32, दिघोरी, नागपूर) आणि खुमारी येथील रहिवासी रेवतीराम उर्फ पप्पू पंचम पाल (वय 40, खुमारी, ता. रामटेक) यांचा अपघाती मृत्यू झाला. पोलिस प्रशासन कुठेतरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या संशयावरून सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास खुमारीवासींनी महामार्गावर चक्का जाम केले. 

 क्‍लिक करा  : जीम ट्रेनरचा वैमनस्यातून काढला काटा

पोलिस प्रशासनाप्रति रोष 
यावेळी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. या चक्का जाममध्ये न्याय्य मागण्यांकरिता स्त्रिया मोठ्‌या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या. पप्पू पाल यांचा मृतदेह घरी आणताच गावकऱ्यांचा रोष अनावर झाला. अख्खे गाव रस्त्यावर उतरले. रामटेकचे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर व अनेकांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले. काही वेळानंतर आमदार आशीष जयस्वाल हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांना आशीष जयस्वाल यांनी यानंतर महामार्गावर वाहतूक पोलिस अवैध वसुली करताना दिसता कामा नये व पोलिस प्रशासनातर्फे मृत पप्पू पाल यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे सांगितले. आपणसुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतरही महिलांचा रोष काही कमी होत नव्हता. उदयसिंह गज्जू यादव यांनी महिलांची समजूत घालून "चक्का जाम' मागे घेऊन पप्पू पाल यांचा अंत्यविधी पूर्ण करण्याचे सांगितले. त्यानंतरच खुमारीवासींनी रस्ता जाम मागे घेण्यात आला. 

क्‍लिक करा  : वाहरे व्वा ! दिव्यांग आहेत, प्रमाणपत्र नाही 

मृत पंचम पालचे कुटूंब अनाथ 
पप्पू पंचम पाल यांचे महामार्गाच्या कडेला छोटेसे नाश्‍ता आणि चहाचे दुकान आहे. वाहतूक पोलिस त्याला नेहमी नाश्‍ता आणि चहा घेऊन बोलवायचे. रविवारी नेहमीप्रमाणे पप्पू नाश्‍ता आणि चहा घेऊन गेला होता. मात्र नियतीने त्याच्यावर घाला घातला. त्याचे अपघाती निधन झाले. पप्पूला हृदयग्रस्त वडील, पत्नी, एक सहा-सात वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा असून पप्पू हा घरात एकमेव कमावता होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of two