तुम्हीच सांगा, लवकर म्हणजे किती दिवस? गृहमंत्र्यांच्या घरासमोर उघा ओबीसींचा घंटानाद

राजेश चरपे
Sunday, 10 January 2021

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बारा हजार जागा भरण्याची घोषणा केली होती. महाविकासआघाडीच्या सरकारला आता वर्षे उलटून गेले आहे. मात्र, भरती प्रक्रिया बंदच आहे. याशिवाय एमपीएससी व इतरही रिक्त जागा भरल्या जात नाही. याचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसत आहे.

नागपूर : मराठा समाजाचा वाटा काढून बारा हजार पोलिसांची भरती आणि इतर रिक्त जागा भरण्यासाठी अखिल भारतील ओबीसी महासंघाच्या वतीने सोमवारी (ता. ११) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांच्या बार हजार जागा भरण्याची प्रक्रिया तीन वर्षांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी काही कारणांनी त्या भरल्या जात नाहीत. यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत आहेत. शासकीय नोकरीत वयाची मर्यादा असते. त्यामुळे अनेक ओबीसी उमेदवारांवर वय निघून गेल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.

अधिक माहितीसाठी - भंडाऱ्यासारखी आग लागू नये म्हणून नक्की काय करावं? 'हे' आहेत रुग्णालयांसाठी सरकारनं आखून दिलेले नियम

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बारा हजार जागा भरण्याची घोषणा केली होती. महाविकासआघाडीच्या सरकारला आता वर्षे उलटून गेले आहे. मात्र, भरती प्रक्रिया बंदच आहे. याशिवाय एमपीएससी व इतरही रिक्त जागा भरल्या जात नाही. याचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसत आहे.

मुख्यमंत्री तसेच महाआघाडी सरकारचे ओबीसींच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ११ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे व पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी प्रमुखाने उपस्थित राहणार आहेत.

जाणून घ्या - "वाचवा होss लेकरांना वाचवा" जिवाच्या आकांतानं ओरडत होत्या माता; अखेर छकुल्यांच्या डोक्यावर पदर टाकून केला आक्रोश

८७ टक्के समाजावर अन्याय का?

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांच्या जागा राखीव ठेवा. उर्वरित जागा भरण्यात याव्या. सरसकट सर्वच नोकर भरतीला स्थगिती दिल्याने ८७ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. तीन वर्षांपासून लवकरच जागा भरल्या जातील असे सांगण्यात येत. मात्र, लवकर म्हणजे किती दिवस असा सवाल डॉ. तायवाडे यांनी केला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation in front of Home Minister Anil Deshmukhs house