नागरिकांनो, आजच करा बँकेचे व्यवहार, गुरुवारी कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

राजेश रामपूरकर
Wednesday, 25 November 2020

विद्यमान सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत गाभ्याच्या उद्योगाचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे देखील खासगीकरण संभवते आणि तशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत करण्यात येत आहेत.

नागपूर : देशभरातील ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे सार्वजनिक, सहकारी बँकांतून काम करणारे पाच लाखांवर सभासद गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय मध्यवर्ती कामगार संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसाच्या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा - बाबा आमटेंच्या 'आनंदवन'मधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

विद्यमान सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत गाभ्याच्या उद्योगाचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे देखील खासगीकरण संभवते आणि तशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रसारीत करण्यात येत आहेत. एकीकडे खासगी क्षेत्रातील बँका येस बँक, लक्ष्मी विलास बँक चुकीच्या मोठ्या उद्योगाला वाटलेल्या कर्ज वाटपामुळे अडचणीत येत आहेत, तर दुसरीकडे सरकार सुस्थितीत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करून सामान्यजनांच्या ठेवी धोक्यात आणू पाहत आहे. एकीकडे सरकार आत्मनिर्भरतेचा नारा देत आहे आणि दुसरीकडे भारतीय खासगी बँक लक्ष्मी विलास बँक विदेशी डीबीएस बँकेच्या भारतीय कंपनीच्या दावणीला बांधू पाहत आहे, असा आरोप महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी केला. 

हेही वाचा - आनंदवनातील वाद : शीतल यांचे आरोप तथ्यहीन, आमटे...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all bank employees strike on thursday in nagpur