deputy mayor.jpg
deputy mayor.jpg

कोरोनाचे डर, त्यात पाण्यासाठी मरमर, कार्यकारी महापौर गेल्या पाणीपुरवठा केंद्रावर

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून नेहरूनगर, सतरंजीपुरा, आसीनगर आणि लकडगंज या चार झोनमध्ये पाणी समस्येने तोंड वर केले आहे. त्यामुळे कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी जलसंपदा विभागाशी चर्चा करून नवेगाव खैरी येथील जलाशयातून 70 दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्याच्या सूचना केल्या.

कन्हान नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपासून नेहरूनगर, सतरंजीपुरा, आशीनगर आणि लकडगंज या चार झोनमधील रहिवासी भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या भीतीने घरांमध्येच असलेल्या नागरिकांत पाणी समस्येवरून संतप्त झाले. अखेर आज कार्यकारी महापौर मनीषा कोठे व स्थायी समिती तथा जलप्रदाय समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेविका सरिता कावरे, माजी नगरसेवक महेंद्र राऊत, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, कनिष्ठ अभियंता भस्मे, ओसीडब्ल्यूचे प्रवीण शरण, दिनेश अटाळकर आदींसह कन्हान येथील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
वाचा- धक्‍कादायक... परदेशी शिक्षणासाठी आता क्रिमिलेअरची अट

 जलसंपदा विभागाशी चर्चा करण्यात आली. त्यामुळे आता नवेगाव खैरी येथील जलाशयातून 70 दशलक्ष घनमीटर पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्यात आले आहे. नवेगाव खैरी ते कन्हान नदी 44 किमी अंतर असून कन्हान नदीत पाणी पोहोचण्यासाठी 48 तासांचा कालावधी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com