बापरे! हिंगण्यातील क्रीडा संकुलात फिरतात मोकाट जनावरं प्रशासनाचं दुर्लक्ष; खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी

animals moving in sports complex in hingna Nagpur
animals moving in sports complex in hingna Nagpur

नागपूर : तालुका पातळीवर खेळाडूंना दर्जेदार सराव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने ठिकठिकाणी तालुका क्रीडा संकुले उभारली. मात्र शासनाच्या उदासिन धोरणामुळे हा उद्देश सफल होताना दिसत नाही. हिंगणा येथील क्रीडा संकुल याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. कासवगतीने बांधकाम सुरू असलेल्या या संकुलात दिवसभर मोकाट जनावरांचा हैदोस असतो. त्यामुळे स्थानिक नागरिक व खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे.

जवळपास दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या संकुलात स्थानिक खेळाडूंसाठी रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन हॉल, संरक्षण भिंत, टॉयलेट-बाथरूम, चेंजिंग रूमसह आवश्यक सोयीसुविधा होणार होत्या. मात्र पुरेशा निधीअभावी बांधकामाला अजूनही पाहिजे त्या प्रमाणात गती मिळू शकली नाही. त्यामुळे संकुल अर्धवट स्थितीत आहे. इतर सुविधा सोडा, साधी संरक्षण भिंतदेखील उभारण्यात आली नाही. 

संपूर्ण परिसर मोकळा असल्यामुळे येथे दिवसभर जनावरांचा हैदोस असतो. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सराव करण्यात अनेक अडचणी येत असून, त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. संकुलाच्या सभोवताल तातडीने कुंपण बांधण्यात यावे, अशी मागणी खेळाडूंसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक 'सकाळ'ने काही दिवसांपूर्वी संकुलाच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता. बातमी प्रकाशित झाल्यानंतर मैदानावर जेसीपी पाठविण्यात आली. मात्र त्यानंतर हे काम पुन्हा थंडबस्त्यात पडले. मुळातच या संकुलासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळेच दहा वर्षे होऊनही स्थिती जैसे थे आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com