esakal | महापालिकेला 'आपली बस' जड, मेट्रोला हस्तांतरणाचा मार्ग मोकळा

बोलून बातमी शोधा

apali bus will transferred to metro in nagpur}

एवढेच नव्हे त्यांनी शहर बसही महामेट्रोनेच चालवावी, असा सल्लाही बैठकीत दिला होता. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला होता. आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे बोरकर म्हणाले. 

महापालिकेला 'आपली बस' जड, मेट्रोला हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : शहर बस महामेट्रोकडे देण्याचा मार्ग मोकळा करीत परिवहन समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली. समितीने याबाबत धोरण ठरविण्यासाठी हा प्रस्ताव सभागृहाकडे वळता केला. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सभापती बाल्या बोरकर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

महापालिकेत परिवहन समितीची बैठक पार पडली. बैठकीत सदस्या व उपमहापौर मनीषा धावडे, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, नागेश मानकर, सदस्या रूपाली ठाकूर, वैशाली रोहनकर, विशाखा बांते, अर्चना पाठक, प्रभारी परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, उपअभियंता केदार मिश्रा, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, तांत्रिक पर्यवेक्षक योगेश लुंगे आदी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत मेट्रोला शहर बसचा विषय असल्याने साऱ्यांचेच लक्ष लागले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शहर वाहतूक व्यवस्था एकाच प्राधिकरणाकडे असावी, असे मत व्यक्त केले होते. एवढेच नव्हे त्यांनी शहर बसही महामेट्रोनेच चालवावी, असा सल्लाही बैठकीत दिला होता. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव तयार केला होता. आज या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे बोरकर म्हणाले. 

हेही वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

कर्मचारीही मेट्रोत जाणार - 
मेट्रोला आपली बस हस्तांतरणाला मंजुरी देतानाच परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचारीही मेट्रोत जातील, असेही बोरकर यांनी नमुद केले. याशिवाय समिती सदस्य नितीन साठवणे व नरेंद्र वालदे यांनी मेट्रोत मनपाचा एक सदस्य विश्वस्त म्हणून नियुक्ती करावी, अशी सूचना केली. या सूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

४७८ बस देणार मेट्रोला - 
मनपाच्या शहर बस सेवेमध्ये २३७ स्टँडर्ड डिझेल बस, ६ महिलांसाठी विशेष 'तेजस्विनी' बस, १५० मिडी व ४५ मिनी बस अशा एकूण ४३८ बस आहेत. याशिवाय ४० इलेक्ट्रिक बस येणार आहेत. अशा एकूण ४७८ बस महामेट्रोला देण्यात येणार असल्याचे बोरकर म्हणाले. या सर्व प्रक्रियेला पाच ते सहा महिने लागतील, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

मनपाच्या जुन्या बसेस भंगारात - 
महापालिकेच्या जुन्या ११० बस भंगारात काढण्यात आले. या बसच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात आली होती. १ कोटी ८६ लाखांत पुणे येथील सिद्धार्थ इन्टरप्रायजेस व दीपक इन्टरप्रायजेसला या भंगार बस देण्यात आल्या. विशेष म्हणजे या निविदासाठी आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती गठीत केली होती. या समितीने ऑनलाइन निविदा मागितल्या होत्या.